MP Election Result : शिवराज मामा सिंहासन राखणार की सत्ताबदल होणार? जाणून घ्या ग्रहांची स्थिती काय
MP Election Result : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) हे नेहमी नशिबावान ठरले आहेत. त्यांचा जन्म 5 मार्च 1959 रोजी सिहोर येथे झाला. अंकशास्त्रावरून लक्षात येते की 21 शतकाच्या पाचव्या वर्षी म्हणजे 2005 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. अचानक घडलेल्या घडामोडीत तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले.
तेव्हापासून ते चार वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत. आता ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. अंकशास्त्रानुसार, जन्म क्रमांक आणि भाग्य क्रमांक 5 दोन्ही चमत्कारिकरित्या त्यांना या वेळी सत्तेवर आणू शकतात किंवा आपण असे म्हणू शकतो की त्यांना 5 व्यांदा मुख्यमंत्री बनण्याची चांगली शक्यता आहे.
2018 मध्येही, भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव आणि काँग्रेसचा विजय झाला होता तरीही 16 महिन्यांनंतर ते पुन्हा सत्तेवर आले. 2005 पासून पाहिले तर ते सतत मध्य प्रदेशचे सर्वमान्य नेते राहिले आहेत. बुधाचा प्रभाव आणि प्रारब्ध क्रमांक 5 चा प्रभाव पूर्ण ताकदीने दिसला तर ते मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास त्यांना पाच वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळू शकेल. हे त्यांच्या कुंडली आणि अंकशास्त्राच्या गणनेत बसते.
वसुंधरा राजे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किती? जाणून घ्या कुंडलीची स्थिती काय सांगते
अशा स्थितीत मध्य प्रदेशात पुन्हा एकदा मामाचे सरकार स्थापन होऊ शकते, असे म्हणता येईल. ज्योतिषीय गणनेनुसार, मामा आणि मध्य प्रदेशचे नाते पुन्हा एकदा घट्ट होणार आहे.
मध्य प्रदेशात सत्तेचे सिंहासन कोण राखणार? याचा निर्णय उद्या 3 डिसेंबरला होणार आहे, मात्र त्याआधी मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोल आले होते. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
मध्य प्रदेश निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. त्याचबरोबर काही जागांवर छोटे पक्ष समीकरण बिघडू शकतात. सीमावर्ती भागात बसपा आणि सपाचे मोठे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत कधी-कधी हे लोक किंगमेकरही बनतात. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष, सपा आणि बसपा यांच्या मदतीने कमलनाथ यांचे सरकार स्थापन करण्यात आले होते.