‘एक फुल अन् दोन डाऊटफुल’; संजय राऊतांचा एका वाक्यात तिघांवर निशाणा

‘एक फुल अन् दोन डाऊटफुल’; संजय राऊतांचा एका वाक्यात तिघांवर निशाणा

Sanjay Raut : राज्यात एक फुल अन् दोन हाफ असं म्हणतात, पण एक फुल अन् दोन डाऊटफुल असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची युवा संघर्ष यात्रा आज नागपूरात पोहोचली आहे. या संघर्षयात्रेदरम्यान आयोजित सभेत संजय राऊत कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

बाजू कमकुवत झाली म्हणून खोट्या अफवा पसरवल्या, केसरकरांकडून अनिल परबांना प्रत्त्युत्तर

संजय राऊत म्हणाले, एक फुल दोन हाफ नाहीतर एक फुल अन् दोन डाऊटफुल आहेत. दोन्ही डाऊटफुल आहेत त्यांच्यात कोणी फुल कोणीच नाही. यांच्यात फुल कोण असेल तर ते म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘पेन्शनसाठी सत्ताधाऱ्यांना टेन्शन द्या, मी मुख्यमंत्री असतो तर’.. कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरून ठाकरेंचा निशाणा

तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपल्याला देशात आणि राज्यात क्रांती करायची असून आमची संघर्ष करण्याची तयारी आहे. अनिल देशमुख इथेच आहेत, ते आमचे जेलमधले मित्र असून जेलमधील मैत्री पक्की असते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होणार? हायकोर्टाने आयोगाला कडक शब्दांत फटकारले

2024 ला मोदी सत्तेत येणार नाहीत :
नागपुरात आज होणारी सभा मर्दांची आहे, पळपुट्यांची नाही. सत्ताधारी सरकारमध्ये अजित पवार मध्येच कुठेतरी लटकलेले आहेत. आगामी काळात 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येणार नसल्याचं भाकीतही संजय राऊत यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाजपला फटका? म्हणून होतेय टीका…

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांना खुलेआम चॅलेंज दिलं आहे. ते म्हणाले, या..ना अंगावर मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक आहे अन् शरद पवारांचा चेला आहे. जेलमध्ये गेलो तरी झोपलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही…या अंगावर मी बाळासाहेबांची शिवसैनिक आणि मी पवारांचा चेलाही आहे याला म्हणतात डबल इंजिन, या शब्दांत राऊतांनी चॅलेंज केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube