भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांचा स्टाईल; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल….
Supriya Sule : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने बंद केल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या याच वक्तव्यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा सांगावा, माझी त्यांच्याबरोबर कुठंही चर्चेला बसायची तयारी आहे, असं आवाहन सुळेंनी केलं.
माझ्या बहिणींच्या विकासाच्या आड याल तर गाठ माझ्याशी…; CM शिंदेंचा विरोधकांना इशारा
सुप्रिया सुळे यांनी आज जळगावात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. फडणवीसांनी केलेल्या आरोपाविषयी सुळेंनी विचारले असता त्या म्हणाल्या, दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांची स्टाईल आहे. चांगल्या योजना आजपर्यंत सरकारने नियमित सुरू ठेवल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं हे हे विधान बालिशपणाचं आहे, अशी टीका सुळेंनी केली.
UPSC Recruitment : 45 पदांसाठी थेट भरती अन् लाखात पगार; खाजगी नोकदारही करू शकणार अर्ज
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे हे स्वतःला भाऊ म्हणवून घेत आहेत. बहिणींना कार्यक्रमाला आमंत्रित करणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वत:ची पाठ थोपटून घेणार. अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहीण-भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमाने काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण, तिला धमक्या देऊ लागलात तर ती कोणालाच घाबरत नाही. हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा, असं चॅलेज सुळेंनी दिलं.
पैसे देऊन कर्तव्य संपत नाही
आगामी सरकार अऩेक योजना जाहीर करेल. पण त्यांना लोकसभेपर्यंत बहीण का आठवली नाही? आम्ही सत्तेत आल्यानंतर प्रत्येक महिलेची सुरक्षितता यावरही आम्ही लक्ष देऊ. केवळ पैसे देऊन कर्तव्य संपत नाही, असा टोला सुळेंनी महायुती सरकारला लगावला.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्याविषयी सुळेंना विचारले असता त्या म्हणाला, सरकारला पराभववाची भीती आहे. नाहीतर ऑक्टोबरमध्ये हरियाणा बरोबर आपली निवडणुक व्हायला पाहिजे होती. नाहीतर पुढं ढकलायचं कारण काय? देशात जेव्हा कश्मिर टू कन्याकुमारी पर्यंत निवडणुका झाल्या. मग आताच असं काय झालं की निवडणुका पुढं ढकलल्या? असा सवाल सुळेंनी केला.