माझ्या बहिणींच्या विकासाच्या आड याल तर गाठ माझ्याशी…; CM शिंदेंचा विरोधकांना इशारा
Eknath Shinde : महायुती (Mahayuti) सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojna) आणली. या बहुचर्चित योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवरून विरोधकांना चांगलाच दम भरला.
UPI मध्ये बदल, बँक खात्याशिवाय होणार पेमेंट, ‘या’ लोकांना मिळणार फायदा
एकवेळ आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करून. पण आमच्या बहिणींच्या विकासाच्या आडवं कोणी आलं तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला.
बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी नेते उपस्थित होते.
UPSC Recruitment : 45 पदांसाठी थेट भरती अन् लाखात पगार; खाजगी नोकदारही करू शकणार अर्ज
यावेळी बोलतांन शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मी मंत्रिमंडळात सांगितलं होतं की, रक्षाबंधनापूर्वी या योजनेचे पैसे पोहोचले पाहिजेत. मात्र, हे पैसे पोहोचतील की नाही ते पाहण्यासाठी काही लोक म्हणाले की, आधी एक रुपया टाकूयात. त्यांनी मी म्हटलं तर एक रुपया टाकला तर विरोधक म्हणतल, तीन हजार देणार म्हणाले आणि एक रुपया टकाला. त्यानंतर आम्ही ठरवलं की, सर्व तीनच्या तीन हजार रुपये टाकायचे आणि योजना सुरू करायची. तेव्हापासून मी कुठेही कार्यक्रमाला गेला तर त्या ठिकाणी लाडक्या बहीणी मला पैसे खात्यात जमा झाल्याचं सांगतात.
तर गाठ माझ्याशी आहे
सावत्र भाऊ खोटे आरोप करत आहे. लाडकी बहिण योजना कशी फसवी आहे, हा चुनावी जुमला आहे असं विरोधक म्हणत आहेत. कोणी म्हणत की, ही काय लाच देता का? असं काहीही ते बोलत आहेत. माझ्या लाडक्या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नव्हे तर मनाची वाटायला पाहिजे. शेवटी, मी एकच सांगतो की, एकवेळ आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करून. पण आमच्या बहिणींच्या विकासाच्या आडवं कोणी आलं तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा, असा असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला.
तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा
शिंदे म्हणाले, आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो. म्हणूनच आम्ही अनेकांना पुरून उरलोय. एवढचं नाही तर सावत्र आणि कपटी भावांवर मी मात करून इथपर्यंत आलो. त्यामुळे सावत्र भावांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. त्यांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा. लाडकी बहिण योजना बंद व्हावी म्हणून ते कोर्टात गेले. पण, न्यायालयाने त्यांना चपराक दिली. न्यायालयाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा, अस आवाहन शिंदेंनी केलं.