1960 मध्येच पवार कुटूंबात राजकीय मतभेद, खुद्द शरद पवारांनी केला आपल्या भावाविरोधात प्रचार

1960 मध्येच पवार कुटूंबात राजकीय मतभेद, खुद्द शरद पवारांनी केला आपल्या भावाविरोधात प्रचार

पवार कुटूंब (Pawar family) अभेद्य आहे असं बोलल्या जातं. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडाळी करून अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला होता. त्यामुळं शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. मात्र, पवार घराण्यात फुट पडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वीही पवार घराण्यात राजकीय मतभेदामुळे तणाव निर्माण झाले होते. केवळ तणावच नाही, तर दरी निर्माण झाली होती. हे प्रकरण नेमंकं आहे तरी काय? नेमकी पवार घराण्यात ही फुट कशी पडली होती? तेव्हा नेमका कोणा-कोणात संघर्ष झाला होता? याच विषयी जाणून घेऊ. (In 1960 political differences in the Pawar family Sharad Pawar himself campaigned against his brother)

पवार कुटुंब हे मुळचं सातारा जिल्ह्यातील नांदोड गावचं. शरद पवाराचे वडिल गोविंदराव पवार हे बारामती जवळील काटेवाडी गावात स्थायिक झाले. त्यांच्या आई शारदाबाई राजकारणात सक्रीय होत्या. त्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या दोन टर्म सदस्य होत्या. 1948 मध्ये कॉंग्रेसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी कॉंग्रेसने जाहिरनाम्यातील आश्वासनांना हरताळ फासल्याचं सांगून कॉंग्रेस हा भांडवलदारांचे हित जपणार पक्ष आहे, असे आरोप केले. कॉंग्रेसमधून बाहेर पडत शेतकरी कामगाराचे राज्य स्थापन करण्यासाठी शेकापची स्थापना केली. तेव्हा पवार गट शेकाप सोबत गेला.

विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि अवसान गमावलेल्या अवस्थेत; CM शिंदेची खोचक टीका 

पुढं 1960 साली शेरद पवार पुण्यात शिक्षण घेते होते. तेव्हा ते कॉंग्रेसच्या संपर्कात आले. युवक कॉंग्रेसचे प्रमुख झाले. बारामतीत लोकसभा मतदास संघाचे केशवराव जेधे यांच निधन झालं. आणि पोटनिवडणुक लागली. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीची ताकद होती. 1957 मध्ये या समितीने कॉंगेसला जेरीस आणलं होतं. ही कॉंग्रेसच्या विरोधातीस पहिली महाआघाडी होती. यात सेनापती बापट, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, प्रल्हाद अत्रे, कम्युनिष्ट आणि समाजावादी नेत्यांचा समावेश होता. पण, तेव्हा कॉंग्रस सत्तेत आली. कॉंग्रेसने केशवराव जेधे यांचे चिरजिव गुलाबराव जेधे यांनी तर शेकापने वंसतराव पवारांना तिकीट दिले. वसंतराव हे शरद पवारांचे थोरले बंधू. तर शरद पवार हे गोविंदराव आणि शारदाबाईंचे आठवे अपत्य.

शारदा पवार आणि वसंतराव पवारांनी शरद पवारांना सांगितलं, तुम्ही कॉग्रेसमध्ये आहात, तर कॉंग्रेसच्या उमेवाराचा प्रचार करा. त्यांनी केलंही तसंच. शरद पवारांनी आपल्या भावाच्या विरोधात जाऊन गुलाबवराव जेधेंचा प्रचार केला. त्यामुळं आणि शरद पवारांचं महत्व आणि ममत्व कॉंग्रेसमध्ये वाढलं.

शरद पवारांचे अनंतराव पवार हे तीन नंबरचे भाऊ. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं. पण, त्यांचा प्राचार्यांशी पहिल्याच दिवशी खटका उडाला. ही गोष्ट गोविंदरावांना पटणारी नव्हती. त्यामुळं त्यांनी अनंतरावांना घरात घेतलं नाही. ते मुंबईत आले आणि त्यांनी व्ही. शांताराम यांच्याकडे काम केलं. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर ते परत बारामीतला आले. गोविंदारव पवार सहसंस्थापक असलेल्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन आणि संचालक झाले.

अनंतराव पवारांच्या पत्नी आणि अजित पवारांच्या आई ह्या नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथल्या आहेत. त्या ज्या कुटुंबातून येतात, त्या कुटुंबाचे आरएसएसशी चांगले संबंध आहेत. अजित पवारांचे मामेभाऊ चंद्रशेखर कदम हे भाजपचे 2004 मध्ये राहुरी मतदार संघातून आमदार होते. जगदीश कमद हे शिवसृष्टीचे महत्वाचे घटक आहेत. त्यांचे बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चांगले संबंध आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube