सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस अन् नाना पटोलेंचा मोठा दावा; ‘राष्ट्रवादीत भाजपचा स्लीपर सेल’!
सुनेत्रा पवारांना सच्चिदानंद सिंह यांची रिमाइंडर नोटीस; तर नोटीसीवर आक्षेप घेत नाना पटोलेंचा राष्ट्रवादीत भाजपचा ‘स्लीपर सेल’ असल्याचा दावा.
Nana Patole alleges a BJP sleeper cell in NCP : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याभोवती पक्षांतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह (Sachchidanand Singh) यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना रिमाइंडर नोटीस पाठवली आहे. 17 ऑगस्ट 2026 रोजी पाठवण्यात आलेली ही नोटीस 9 जुलै रोजी बजावलेल्या कायदेशीर नोटीसीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. पहिल्या नोटीसीला निर्धारित 15 दिवसांत उत्तर मिळाले नसल्याचा दावा सिंह यांनी केला आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरच आक्षेप
या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू 26 फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड आहे. या निवडीवरच सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतला असून, पक्षाच्या घटनेतील तरतुदींचे पालन न करता सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
एकाच व्यक्तीच्या नावावर किती SIM? सरकारने मर्यादा ठरवली; नियम चुकला तर कनेक्शन बंद
सिंह यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले नव्हते. तसेच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही आणि राष्ट्रीय प्रतिनिधींना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची किंवा मतदान करण्याची संधीही देण्यात आली नाही. त्यामुळे 26 फेब्रुवारीची निवडणूक आणि त्यावर आधारित पदाधिकाऱ्यांची यादी रद्दबातल ठरवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवडणूक आयोग आणि न्यायालयात जाण्याचा इशारा
या नोटीसीची प्रत सुनेत्रा अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सरचिटणीस तथा निवडणूक आयोगाचे नोडल अधिकारी बृजमोहन श्रीवास्तव यांना पाठवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाला यापूर्वी पाठवलेला पत्रव्यवहार मागे घ्यावा आणि पक्षाच्या घटनेनुसार नव्याने निवडणूक प्राधिकरण नियुक्त करून संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Tukaram Mundhe : बनावट दुधासाठी वापरली जाणारी व्हे पावडर आष्टीमधून जप्त
15 दिवसांत उत्तर न मिळाल्यास किंवा मागण्यांची पूर्तता न झाल्यास निवडणूक आयोग अथवा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सिंह यांनी दिला आहे.
नाना पटोलेंचा ‘स्लीपर सेल’चा दावा
दरम्यान, या नोटीस प्रकरणावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळाच दावा केला आहे. सुनेत्रा पवारांना देण्यात आलेल्या नोटीसीमागे राष्ट्रवादीतील भाजपशी संबंधित काही व्यक्तींचा हात असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
सरकारच्या कामाची पोलखोल करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला बक्षीस; दाखवला घरचा रास्ता
“सुनेत्रा पवारांना जी नोटीस देण्यात आली आहे, ती त्यांच्या पक्षांतर्गत आहे. यामागे त्यांच्या पक्षात असलेले भाजपाचे काही हस्तक असू शकतात. त्यांना स्लीपर सेल म्हणता येईल. त्यापैकी कोणाचा तरी यात हात असेल, असं मला वाटतं,” असं नाना पटोले म्हणाले.
भाजपा आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
नाना पटोलेंनी केलेल्या या आरोपांनंतर आता भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष! ‘द रेव्होल्यूशनरीज’चे भव्य भक्तिगीत ‘जय दुर्गा’ प्रदर्शित