Nana Patole : ‘त्यांना गांभीर्याने घेऊ नका’, पटोलेंचा नाना पाटेकरांना टोला

  • Written By: Published:
Nana Patole : ‘त्यांना गांभीर्याने घेऊ नका’, पटोलेंचा नाना पाटेकरांना टोला

Nana Patole on Nana Patekar : मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले होतं. 2024 मध्ये पुन्हा भाजप येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांकडून मुरकुटेंना राष्ट्रवादीची ऑफर… मुरकुटेंनी स्पष्ट केली भूमिका 

नाना पाटेकरांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक चित्रपटात भूमिका साकारून त्यांनी आपली ओळख बनवली. फक्त सिनेमेच नाही तर, त्यांच्या परखड वक्तव्यांमुळंही ते चर्चेत असतात. त्यामुळं कधी त्यांना टीका सहन करावी लागते. तर कधी त्यांचं कौतुक होतं. अशाच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकींविषयी भाष्य केलं. त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका, असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

MPhil ची पदवी अवैध; अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नका; अ‍ॅडमिशन थांबवण्याचे UGC चे निर्देश 

नेमकं पाटेकर काय म्हणाले ?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकररांना आगामी लोकसभा निवडणुकीविषयी विचारण्यात आले होते. त्यावर नाना पाटेकर म्हणाले होते, ‘मला वाटतं, पुन्हा भाजप मोठ्या संख्येने सत्तेत येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची सरशी होईल. भाजपला 350 ते 375 जागा मिळतील. कारण, देशात भाजपशिवाय पर्याय नाही. भाजपकडून ऐवढं चांगलं काम चाललं आहे की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, असं पाटेकर म्हणाले होते.

दरम्यान, नाना पटोलेंनी केलेल्या टीकेला आता नाना पाटेकर काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube