उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताचं शिंदे गटाचं टीकास्त्र
Naresh Mhaske : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोपदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरून आता शिंदे गटाचे नेते प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला. (Naresh Mhaske Reaction on Jitendra Awhads as the leader of the opposition they critise sharad pawar)
म्हस्के यांनी सांगितलं की, जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष म्हणून निवड झाली असेल तर माझ्याकडून आणि आमच्या पक्षाकडुन त्यांना शुभेच्छा. मात्र, विरोधी पक्ष नेता निवडण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. आता पवार साहेबांनीही त्यांच्या मुलाखतीत तेच सांगितलं. सर्व आमदार आपल्या सोबत असल्याचं अजित पवारही सांगत आहेत. प्रफुल्ल पटेलही तेच म्हणाले की, सर्व आमदार आमच्या सोबत आहे. मग जो पक्ष सत्तेत आहे, ज्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आहे, त्या पक्षाचा उमेवार विरोधी पक्षनेता कसा होऊ शकतो? असा सवाल म्हस्के यांनी केला.
ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड हे अजित पवार कधी एकदा भाजपमध्ये जातात, आणि मला विरोधी पक्षनेतेपद मिळतं, याचीच जणू वाट पाहून होते. हे म्हणजे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, असा टोला लगावला. आज पत्रकार परिषदेत आव्हाडांनी शरद पवारांचा उल्लेख म्हाथारा असा उल्लेख केल्याची टीकाही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी आणि शहा यांना राज्यात मोठा दिलासा? अजित पवार ठरले निमित्त
अजित पवारांच्या शपथविधीनंतर संजय राऊत यांनी 16 आमदार अपात्र होतील, परिणामी, सत्ता हातून जाईल या भीतीने भाजपने नवा मित्र शोधला. या घडामोडींमुळं मुख्यमंत्री नाराज असल्याचं राऊत म्हणाले. यावरही म्हस्के यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री नाराज नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं नाट्य झालं….. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवली. लोकांनी युतीला कौल दिला. पण आपल्याला सत्ता चालवता यावी, यासाठी पवारांना एक बूजगावण हवं होत. पदाच्या लालसेपायी ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले. नंतर शिवसेनेत फुट पडली. संजय राऊत यांच्यामुळं ठाकरे गटाचा क्लिनबोल्ड झाला. त्यांनी ज्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची वाट लावली, त्या शरद पवारांचाही राऊतांनी क्लिनबोल्ड केला. करावे तसे भरावे, ही म्हण शरद पवारांना तंतोतंद लागू होते. शरद पवारांनी शिवसेनेची जी दशा केली, त्याचं फळ त्यांना मिळाल्याचं म्हस्के म्हणाले.