“… अविश्वास असेल तर मी नियुक्त केलेले अध्यक्ष योग्य कसे?” उपाध्यक्ष Narhari Zirwal स्पष्टच बोलले
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ झाला. यावेळी बंड पुकारणाऱ्या आमदारांबरोबरच उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हेही चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी झिरवाळ याच्याविरोधामध्ये अविश्वास ठरावाची नोटीस पाठवली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली होती. तुमच्याविरुद्धच्या अर्जावर तुम्ही स्वतः न्यायाधीश कसे काय झाले, असा सवाल सुप्रीम कोर्टाने (supreme Court) विचारला होता. याला झिरवाळ यांनी उत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे आणि बंड पुकारलेल्या आमदारांनी नंतर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने नरहरी झिरवाळ यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या या नियुक्तीला शिंदे गटाने मोठा विरोध दर्शविला होता. तसेच अविश्वास ठरावाची नोटीस पाठवली होती. मात्र, शिंदे गटाची नोटीस त्यांनी फेटाळून लावण्यात आली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले होते. या बरोबरच उपसभापतींनी किती अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या, अशीही विचारणा केली होती. विधासनसभा अध्यक्षांची निवड केली, मग अविश्वास ठरावावर नरहरी झिरवाळ स्पष्टच सांगितलं आहे.
विधानसभेचे सदस्य नसलेल्यांच्या आयडीवरून माझ्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाचा मेल करण्यात आला होता. असत्यापित ईमेल आयडीवरून संदेश मिळाल्याने ते नाकारले होते. ३९ आमदारांचे मेल आले होते, असे नरहरी झिरवाळ यांनी सुप्रीम कोर्टात (supreme Court) उत्तर दाखल करताना देखील सांगितले होते. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला नरहरी झिरवाळ यांनी विरोध केला होता. अपात्रतेची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत बंड केल्याने आमदारांना सभागृहात प्रवेश देऊ नये, अशी विनंती करण्यात आली. अधिवेशन सुरू असतानाच उपसभापतींना हटवण्याची नोटीस देता येईल, असेही झिरवाळ (Narhari Zirwal) म्हणाले.
Chandrakant Patil आजारी शरद पवारांना फिरवता… हे अमानवी नाही का ?
विधानसभेला (Assembly) जवळपास वर्षभर सभापती नव्हते. काँग्रेस नेते नाना पटोले हे पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष झाल्यानंतर २०२१ पासून हे पद रिक्त होते. त्यामुळे उपसभापती नरहरी झिरवाळ महत्त्वाचे निर्णय घेत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्य व्हिप पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच अजय चौधरी यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. याशिवाय त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पक्ष सोडण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या.
अध्यक्षांची निवड मग कशी चालते ?
“माझ्यावर अविश्वास दाखवत असाल तर नव्या अध्यक्षाची मी निवड केली आहे. मग माझ्या अध्यक्षतेखाली निवड झालेल्या अध्यक्षांची निवड चुकीची आहे का? कारण मी अयोग्य असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली झालेली अध्यक्षांची निवडही अयोग्य ठरेल”, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली