Maharashtra Politics : काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; फडणवीसांच्या उपस्थितीत दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

Maharashtra Politics : काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; फडणवीसांच्या उपस्थितीत दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

Amruta Pawar, Anantrao Deshmukh join BJP  :  राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP )  मोठे खिंडार पडले आहे. याचे कारण माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार  (Amruta Pawar ), कॉंग्रेस नेते माजी खासदार अनंतराव देशमुख, अॅड, नकुल देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आहे.

अमृता पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या. त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. परंतु स्थानिक राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. अमृता पवार या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या देखील आहेत.

म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या

तसेच या व्यतिरिक्त ठाकरे गटाचे पुण्याचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, ठाकरे गटाचे कोल्हापूर जि.प.चे माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, संतोष माळवीकर, ठाकरे गटाचे उपनेते बबन घोलप यांच्या कन्या तनुजाताई घोलप, दिंगबर देसाई यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. कसबा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर ठाकरे गटाचे शहर प्रमुख श्याम देशपांडे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अमृता पवार या निफाड तालुक्यातील देवगाव या गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. त्यांनी या ठिकाणी 10 हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळेत अमृता चर्चेत आल्या होत्या. विशेष म्हणजे अमृता यांचा देवगाव हा गट माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील ही एक मोठी घडामोड म्हणून याकडे पाहिले जात आहे.

अमृता पवार या आर्किटेक्ट आहे. त्यांचे कुटूंब आधीपासून शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे. पण स्थानिक पातळीवर पक्षांतर्गतच अडवणुक केली जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. विकासकामाचे श्रेय घेण्यावरुन देखील बरेच वाद आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रहाखातर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

भूषण देसाई यांना शिवसेनेत घेताच भाजपचा एकनाथ शिंदेंना इशारा..

दरम्यान, यामुळे आगामी विधानसभा, लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला मोठे  खिंडार पडले आहे. तर भाजपची ताकद मात्र वाढली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube