‘जाळपोळ घटनेशी मराठा बांधवांचा संबंध नाही’; संदीप क्षीरसागरांनी अधिवेशनात सांगितलं

‘जाळपोळ घटनेशी मराठा बांधवांचा संबंध नाही’; संदीप क्षीरसागरांनी अधिवेशनात सांगितलं

Sandip Kshirsagar : बीडच्या जाळपोळ घटनेशी मराठा बांधवांशी कुठलाही संबंध नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी केलं आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेनंतर हिवाळी अधिवेशनात (Winter Session) संदीप क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले आहेत. यावेळी त्यांनी घटनेप्रकरणी राज्याच्या गृहखात्यावर ताशेरे ओढले आहेत. तसेच न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली आहे.

‘मुलाचा फोन, पप्पा लवकर या आपलं घर जळंतयं’; क्षीरसागरांची अधिवेशनात मांडली व्यथा

संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडच्या जाळपोळच्या घटनेनंतर मी बारकाईने परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर समोर आलं की जाळपोळीच्या घटनेत मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांचा कुठलाही संबंध नाही. जाळपोळच्या घटनेनंतर हे लोकं माझ्या घरापासून इतर लोकांची घरे जाळण्यासाठी पायी निघाले होते. सीसीटीव्ही फुटेजनूसार हे लोकं मॉबमध्ये फिरत होते. त्यांच्या पेट्रोल, फॉस्परस बॉम्ब देखील होते. पोलिसही या लोकांसोबत चालत असल्याचं दिसून आलं असल्याचा आरोपही संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द; म्हणाले, आम्हाला वेळ दिली होती पण…

तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर समजलं की हे लोकं कुणाशी तरी निगडीत आहे. यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर सत्य समोर येईल. या प्रकारानंतर ओबीसी-मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला मी खोटं बोलणार नाही या विषयाच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी न्यायालयीन चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे ही कळकळीची विनंती असल्याचंही क्षीरसागर म्हणाले आहेत.

‘न्यायालयात टिकणारंच आरक्षण द्या’; रोहित पवारांची CM शिंदेंना हात जोडून विनंती

तसेच माझं घर पूर्णपणे एक तास जळत होतं. त्यानंतर पूर्ण बीड शहर 7-8 तासांत जळत होतं. त्यावेळी पोलिस प्रशासन मध्ये का आलं नाही. एकनाथ खडसेंची तब्येत बिघडली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एअर अॅम्बुलन्स पाठवली मग माझं घर जळत होतं तेव्हा पोलिसांचे हात कोणी बांधले होते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

घटनेचा मास्टरमाईंड कोण?
जाळपोळीच्या घटनेनंतर या लोकांनी बस स्टॅंडमध्ये तोडफोड केली. तिथं सिव्हील हॉस्पिटलमध्ये तोंड धुतलं आणि निघून गेले. त्यांच्या गाड्यांचे नंबरचे सर्व फुटेज आहे. हे लोकं एकमेकांशी संवाद साधून सांगत होते की या नंबरला जा तिकडं. या घटनेमागचा मास्टमाईंड कोण? ते शोधून काढणं गरजेचं असून घटनेची न्यायालयीन झाली पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube