‘ट्रम्पना स्वीय सहाय्यक हवा असेल तर विखेंना घेऊन जा!’; लंके-विखेंमध्ये टोलेबाजी सुरूच

नगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Nilesh Lanke Slams Sujay Vikhe

Nilesh Lanke Slams Sujay Vikhe : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या युद्धनीतीमुळे नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडल्याचे भाष्य भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले. विखे यांचे वक्तव्य हास्यस्पद आहे नगर मनमाड रस्ता व ट्रम्प यांचा कुठलाही संबंध जुळून येत नाही. पाच वर्ष या मतदार संघाचे नेतृत्व केलं, त्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य येत असेल, तर हा लाजिरवाणा प्रकार आहे. अशा शब्दात खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विखे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

आमदार संग्राम जगतापांसह 19 जणांवर गुन्हा दाखल, कर्जत रास्ता रोको प्रकरण भोवलं

तसेच पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांना मी विनंती करणार आहे की तुम्हाला स्वीय सहाय्यक म्हणून जर गरज भासत असेल तर त्यांना घेऊन जा”, असा खोचक टोला देखील लंके यांनी लगावला. नगर मनमाड रस्ता आपणच करू, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केले. यावरती लंके म्हणाले, “ते सध्या कुठल्याही पदावर नाही, साधे ग्रामपंचायत सदस्य देखील ते नाही,  त्या रस्त्याचे कामकाज माझ्या कार्यकाळात सुरू झाले असून तो रस्ता देखील आपणच पूर्ण करणार” असा विश्वास देखील नक्की यांनी व्यक्त केला.

नगर मनमाड ची साडेसाती संपेना

नगर मनमाड रस्त्याच्या ठेकेदाराबाबत आपण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली असून, त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच पुन्हा एकदा नव्याने टेंडर देण्यात येऊन एक चांगल्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येईल, तसेच या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यावर राजकारण करण्यापेक्षा या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे, असं लंके म्हणाले.

दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी सचिन अंदुरेला हायकोर्टाकडून जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

ठेकेदारांना सातत्याने ब्लॅकलिस्ट केले जात असल्याने या मुद्द्यावरून सुजय विखे यांनीही लंके यांच्यावर निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना लंके म्हणाले की, “काम चांगले असेल, तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले जात नाही. मात्र, ज्यांचे काम व्यवस्थित नाही आणि कामाची गुणवत्ता योग्य नाही, अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केले जाते.”

“मात्र, जनतेला माहिती आहे की ठेकेदाराला कोण त्रास देत होते, तसेच कोण आपल्या बगलबच्चांना कामे देण्यासाठी दबाव आणत होते आणि रस्त्याचे वाटोळे कोणी केले, याचीही जनतेला माहिती आहे,” असा आरोप लंके यांनी केला.

सिस्पे प्रकरणाशी आमचा काही एक संबंध नव्हता

सिस्पे प्रकरणातील मुख्य आरोपीला परदेशातून अटक करण्यात आली आरोपीला अटक करण्यामध्ये व त्याचा मागोवा घेण्यामध्ये आपला पुढाकार असल्याचं लंके यांनी म्हटले होते. यावरती विखे यांनी त्यांना रॉचे एजंट करून टाकावे, असे देखील म्हटले होते. यावरती लंके म्हणाले, “माझ्यावर आरोप करणे एवढाच धंदा त्यांचा आहे, ते माझे राजकीय प्रसिद्ध प्रमुख आहेत. सिस्पे प्रकरणाचा आणि आमचा काही एक संबंध नव्हता मात्र आमच्या नावाने मोठे आरोप झाले. मात्र गोरगरिबांच्या पैसे अडकले असल्याने आम्ही आमची यंत्रणा कामी लावली.

भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं ट्रम्पकडून कौतुक; अमेरिकेत नियम कडक करण्याचं आवाहन

“आम्ही कुठेही भाषणं देत बसलो नाही. आम्ही कागदपत्रे तपासली आणि आरोपीचा माग काढला. तुम्ही केवळ भाषणबाजी करायची आणि त्यावर राजकारण करायचं, हा तुमचा धंदा आहे,” असा टोलाही लंके यांनी लगावला.

या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप होत राहतील. मात्र, आमच्याकडे सर्व पुरावे होते आणि ते आम्ही सादरही केले आहेत. आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही, अशा शब्दांत खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Shiv Sena party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर ठाकरेंचा दावा; सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद Live

follow us