आता ते 50 कोटी कुठे गेलेत ? एकनाथ शिंदेंनी थेट सभागृहातच ठाकरेंना घेरले !

  • Written By: Published:
आता ते 50 कोटी कुठे गेलेत ? एकनाथ शिंदेंनी थेट सभागृहातच ठाकरेंना घेरले !

Mahrashtra Monsoon Session : विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. खोकेबाज सरकार म्हणून हिणविणाऱ्यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट उत्तर दिले. शिवसेना पक्ष व चिन्ह मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी बँक खात्यातील 50 कोटी मागितले होते. ते 50 कोटी रुपये एका मिनिटात त्यांना देऊन टाकले, असे सांगत आता खरे खोकेबाज आणि खरे धोकेबाज कोण आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ( where has that 50 crores gone? Eknath Shinde attack on uddhav thackeray)


Pune : “माझ्या संपूर्ण शरीरावर बॉम्ब”; वृद्ध महिलेच्या दाव्याने पुणे विमानतळावर खळबळ

आम्हाला गद्दार म्हणता, बेईमानी केली अशी भाषा वापरता. परंतु खरी गद्दारी तुम्ही केली आहे. तुम्हीच शिवसेनेशी विश्वासघात केला आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे. खुप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण संयम बाळगतो. 50 खोकांचे आरोप रोज करतात. शिव्याशाप देतात. परंतु माझ्याकडे शिवसेना आल्यानंतर शिवसेनेच्या खात्यामध्ये असलेले 50 कोटी रुपये मागण्यासाठी लगेच पत्र देतात. प्रॉपर्टासाठी नाही तर बाळासाहेबांचे विचारासाठी मी काम करतो. म्हणून मी एका मिनिटात 50 कोटी रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करून टाकले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Assembly Session : जुगार अड्ड्यावर बसला आहात का? सभागृहातच बच्चू कडूंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार

आम्हाला खोकेबाज म्हणणाऱ्यांनी 50 कोटी रुपये कुठे गेले आहेत. कसे गेले आहेत. आता ते सांगून टाकावे, असे आवाहनच शिंदे यांनी केले आहे. आता एकच काढले आहे. आणखी खूप काही आहे. वेळ आल्यावर तेही सांगेल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

रोकडे बंद झाल्यानंतर खेकडे दिसायला लागले

आम्हाला खेकडे म्हटले जाते. रोकडे बंद झाल्यानंतर खेकडे दिसायला लागले आहेत. कुणी कुणाचे पाय खेचले आहेत. ते सर्वांना माहित आहे. नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, मनोहर जोशी यांच्याबरोबर ते कसे वागले. मी रक्ताचे पाणी करून शिवसेनेसाठी काम केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube