विरोधकांचे चित्रपट प्लॉप, आता चोरलं चोरलं म्हणून ओरडू नका, CM शिंदेंचे विरोधकांवर टीकास्त्र
Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2024) विरोधकांनी शेतकरी, बेरोजगारी आदी मुद्यांवरून गेले तीन दिवस सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. काही लोक अर्थपूर्ण गोष्टी बोलण्याऐवजी निरर्थक टीका करतात. आता विरोधकांचे चित्रपट प्लॉप होत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
Baplyaok ची पुरस्कार नामांकनात बाजी, अभिनेता शशांककडून भावना व्यक्त
आज सभागृहात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एकाच स्क्रिप्टवरचे विरोधकांचे चित्रपट प्लॉप होत आहेत. सरकारने जनतेच्या हिताची कामं केल्यानं विरोधकांकडे मुद्देच नाहीत, मात्र काही लोक अर्थपूर्ण गोष्टी बोलण्याऐवजी निरर्थक टीका करतात विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही, त्यांनी काय दिले, याचा हिशोब आमच्याकडे आहे. त्यामुळे शेतकरी कोमात गेला आहे, अशी भाषा योग्य नाही, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू आम्ही पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Ultra-Processed Foods च्या अतिसेवनाने 32 गंभीर आजारांचा धोका; अभ्यासकांनी केले सावध
अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत आले आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडणार नाही. डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. सरकारच्या कामामुळे विरोधी पक्ष कोमात गेला, अशी सध्याची परिस्थिती आहे. विरोधकांचे काम पोकळ आहे, आमचे काम भरीव आहे.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचाही जोरदार समाजार घेतला. चोरलं चोरलं म्हणून ओरडू नका, मर्दासारखे बोला. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी आरोप करू नयेत, खोके-खोके म्हणणाऱ्यांना शिवनेच्या खात्यातून 50 कोटी घेतले अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
अडीच घर तिरकी चाल चालणाऱ्या ठाकरे सरकारनं सिंचन प्रकल्प रोखले होते, असंही शिंदे म्हणाले. काहीजण आमदारकी वाचवण्यसााठी सभागृहात हजेरी लावतात, असा टोलाही त्यांनी लगावला.