Cabinate Expanssion : आमचे 20 मंत्री 40 मंत्र्यांचं काम करतात, बच्चू कडूंचा अजित पवारांना टोला

Pawr Kdu

अमरावती : ‘आमचे 20 मंत्री 40 मंत्र्या सारखं काम करत आहे. आमचे 20 च मंत्री सक्षम आहे कोणाचे काम आवडले असेल तर सांगा त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता नाही. तर यापुढे कोणी मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय काढू नये.’ असा टोला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना नऊ महिन्यात बाळ जन्माला येत मात्र शिंदे-फडणवीस सरकारला सात महिने पूर्ण झाले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही अशी टीका केली होती. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रतिउत्तर दिलं आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : मोदी मुंबईत राजकीय भाषण करणार असतील तर…

त्याचबरोबर आमदार बच्चू कडू म्हणाले, अजित दादांनी दिलेले उदाहरण फार चांगलं नाही दुसरे उदाहरणही अजित पवारांना देता आलं असतं, विस्तार जरी झाला नाही तरी कामकाज काही कमी नाही, मागच्या सरकारमध्ये विस्तार झाला मात्र कामाच झालं नाही असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारावर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र अद्याप देखील हा विस्तार झालेला नाही. त्यावरून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

Tags

follow us