धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, पंकजाताईंनी हात झटकले, म्हणाल्या, ‘मी काय बोलू…’
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी हे काहीच पाहत नाही. मी फक्त तुम्हा प्रसारमाध्यमांचे ऐकून घेते. मी यावर काय बोलू,
 
          Pankaja Munde : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh) प्रकरणात वाल्मिक कराडचा (Walmik Karad) पाय खोलात गेल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्याकडून सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. यााबाबत आज माध्यमांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विचारले असता त्यांनी मी काय बोलू,अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिनलाही मागे टाकलंं, श्रीलंकेविरुद्ध स्टिव्ह स्मिथचा महा ‘रेकॉर्ड’, गाठला 10 हजार धावांचा आकडा
काही काळापूर्वी पंकजा मुंडे यांची मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार क्षीरसागर यांच्या अजित पवार आणि फडणवीस मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीत, या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता असं विचारलं. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी हे काहीच पाहत नाही. मी फक्त तुम्हा प्रसारमाध्यमांचे ऐकून घेते. मी यावर काय बोलू, असं म्हणत त्या निघून गेल्या. थोडक्यात काय तर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करणे टाळलं आहे.
‘प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नाही…’, अधिकाऱ्याने सांगितलं मध्यरात्री 1 वाजता नेमकं काय घडलं?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे म्हणाल्या होते की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर माझे त्यांच्या कुटुंबियांशी बोलणे झाले. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत त्या आता सावध सावध भूमिका घेतांना दिसत आहेत.
धनंजय मुंडे राजीनाम्यावर काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य केलं. मुंडे म्हणाले की, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. जर माझ्या राजीनाम्याने सगळ्या गोष्टी सुटणार असतील तर राजीनामा देईल. माझ्या वरिष्ठांनी मला माझा दोष सांगावा. माझी नैतिकता जनतेप्रती प्रामाणिक आहे आणि मी आतापर्यंत प्रामाणिक भूमिका मांडली आहे. या प्रकरणात अजूनही मला टार्गेट केलं जातंय, असं ते म्हणाले.


 
                            





 
		


 
                         
                        