सचिनलाही मागे टाकलंं, श्रीलंकेविरुद्ध स्टिव्ह स्मिथचा महा ‘रेकॉर्ड’, गाठला 10 हजार धावांचा आकडा

Steve Smith : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) श्रीलंकेविरुध्द (SL vs AUS 2025) सुरू असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात

  • Written By: Published:
Steve Smith

Steve Smith : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) श्रीलंकेविरुध्द (SL vs AUS 2025) सुरू असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात अनेक दिग्गजांना मागे टाकत नविन विक्रम केला आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फक्त एक धाव करुन कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथने 10 हजार धावा पूर्ण केले आहे. भारताविरुध्द बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी (BGT) दरम्यान स्मिथने 9999 धावा कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केले होते. तर आज श्रीलंकेविरुध्द गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये त्याने 10 हजार धावा पूर्ण केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारा स्मिथ जगातील 15 वा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. स्मिथपूर्वी अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांनी ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावापूर्ण केले आहे. आज 10 हजार धावापूर्ण करताच स्मिथने सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे. स्मिथ आता सर्वात कमी सामन्यांमध्ये 10 हजार धावापूर्ण करणारा संयुक्तपणे जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये 10 हजार धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्याने 111 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 122 सामन्यांमध्ये 10 हजार धावांचा आकडा गाठला होता तर आता स्मिथने फक्त 115 व्या कसोटी सामन्यात 10 हजार धावा केल्या आहे. याचबरोबर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारानेही 115 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे.

मी सध्या टार्गेटवर…सूत्रधार तुम्हीच सांगा; संतोष देशमुखांवरील प्रश्नावर मुंडेंचं उत्तर

तर दुसरीकडे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या जो रूटने (Joe Root) सर्वाधिक धावा केल्या आहेत त्याने आतापर्यंत 12972 धावा केल्या आहे. रूट लवकरच द्रविड (13288), जॅक कॅलिस (13289) आणि रिकी पॉन्टिंग (13378) यांना मागे टाकू शकतो.

follow us