टीम इंडिया पु्न्हा फ्लॉप! ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कोरलं नाव; मालिका 3-1 ने जिंकली
IND vs AUS Sydney Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत हा सामना अगदी सहज जिंकला. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ऑस्ट्रेलियाची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. तर भारतीय संघाची मात्र मोठी पिछेहाट झाली आहे. या सामन्यात गोलंदाजांनी भरपूर प्रयत्न केले पंरतु,फलंदाजांची साथ मिळाली नाही. सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 162 धावा तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केल्या.
AUS vs IND : कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियामधून बाहेर? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण हा निर्णय चुकीचा ठरला. रोहित शर्मा या सामन्यात नव्हता. खराब फॉर्ममुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं होतं. यामुळे संघाचं कर्णधारपद जसप्रित बुमराहकडे देण्यात आलं. पहिल्या डावात भारताने फक्त 185 धावा केल्या. फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. परंतु, गोलंदाजांनी याची भरपाई केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर रोखता आलं.
आता दुसऱ्या डावात तरी फलंदाज आपली जबाबदारी ओळखून चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. पण तीच अवसानघातकी कामगिरीची पुनरावृत्ती त्यांच्याकडून झाली. ऋषभ पंतनेच फक्त 33 चेंडूत 61 धावा केल्या. त्याच्या फलंदाजीमुळे भारताला किमान 150 धावांचा टप्पा तरी पार करता आला. बाकीच्या कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर त्यांनी एक प्रकारे शरणागतीच पत्करली. त्यामुळे भारतीय संघाला फक्त 157 धावा करता आल्या.
पहिल्या डावातील 4 धावा आणि दुसऱ्या डावातील 157 धावा असे एकूण 162 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाला मिळालं. जसप्रित बुमराह तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. पण गोलंदाजी करण्यासाठी तो फिट नव्हता. त्याच्या गैरहजेरीत प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली. कृष्णाने मात्र या संधीचा फायदा घेतला. पण दुसऱ्या बाजूने त्याला मदत मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 58 धावांवर 3 विकेट असा होता.
यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. 46 धावांची महत्वाची भागीदारी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय आणखी सोपा झाला. ख्वाजाने 41 धावा केल्या. यानंतर हेडने ब्यू वेबस्टर बरोबर ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. ट्रॅव्हिस हेडने 34 तर वेबस्टरने नाबाद 39 धावा केल्या. दरम्यान, या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलियाची दावेदारी आणखी मजबूत झाली आहे.
कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचे ‘हे’ 5 मोठे विक्रम, अजून कोणीच मोडू शकलेलं नाही