राष्ट्रवादीच्या खासदारासाठी भाजपच्याच आमदारांच्या टाळ्या जास्त; पंकजांचा फडणवीसांकडे तक्रारीचा सूर

राष्ट्रवादीच्या खासदारासाठी भाजपच्याच आमदारांच्या टाळ्या जास्त; पंकजांचा फडणवीसांकडे तक्रारीचा सूर

Pankaja Munde to Devendra Fadanvis on The Khuntephal Irrigation Project : आज बुधवार 5 फेब्रुवारी बीड जिल्ह्यातील भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मतदार संघामध्ये आष्टी जवळील खुंटेफळ येथे सिंचन प्रकल्पाचा उद्घाटन पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी गेल्यात कित्येक दिवसांपासून कट्टर विरोधक झालेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच मंचावर आले होते.

मी आण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाही; बीडमध्ये पंकजांची धसांबाबत खंत

या कार्यक्रामात मुंडेंनी भाषण करताना जेव्हा जेव्हा विरोधी आमदारांच्या नावांचा उल्लेख केला. तेव्हा तेव्हा प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला. पंकजा मुंडे बोलत असताना त्यांनी आपला पराभव करत निवडून आलेले खासदार बजरंग सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा विदर्भाकडेच? भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘पंजा’ जिवंत ठेवणाऱ्या नेत्याचे नाव निश्चित

तसेच सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख केला. लोकांचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला यावर मुंडे म्हणाल्या की राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हटलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजतात त्यानंतर देखील संदीप क्षीरसागर यांचे नाव घेतल्यानंतरही मोठा जल्लोष करण्यात आला. त्यावरून पंकजा मुंडेंनी फडणवीसांना सांगितले की, पाहाताय ना? की विरोधी आमदारांची नावे घेतले की जल्लोष वाढतो आहे.

Video: मी बोललो की बीडची बदनामी होते; सीएम फडणवीसांच्या समोरच धसांचा बीडच्या नेत्यांना टोला

त्याचबरोबर यावेळी सुरेश धस जसे तुम्ही चित्रपटांचे डायलॉग म्हणता. तसे आम्ही देखील म्हणते की, मेरा वचन हे मेरा शासन है. त्यामुळे मी सुरेश धस यांना जाहीर रित्या जे वचन दिले. तेच माझं शासनाने मी गोपीनाथ मुंडे यांचे लेक आहे. बोलने एक अन् करने एक माझ्या रक्तात नाही. सुरेश धस मी पण तुम्हाला अण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाही. आपलं प्रेमाचं नातं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इज्जत देतो. असं म्हणत खंत व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube