जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचा हात, शरद पवारांनीच दिले थेट उत्तर

जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचा हात, शरद पवारांनीच दिले थेट उत्तर

Sharad Pawar on Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची काल जाहीर सभा झाली. या सभेतून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप केला होता.

भाजपकडून केलेल्या आरोपावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ही गोष्ट माझ्याबाबतीत महाराष्ट्रात नेहमी होते. लातूरला भूकंप झाला त्यावेळी देखील मला जबाबदार धरले होते. अशा गोष्टी केल्या जातात.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते?
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं आहे. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात गरळ ओकू नये. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे फडणवीसांनी सदावर्तेंना समज द्यावी, असा इशारा त्यांनी दिला होता.

कोकण पदवीधरसाठी भाजपमधून नीलेश राणे इच्छुक? निरंजन डावखरेंना पक्षातूनच स्पर्धक

ते पुढं म्हणाले होते की गोरगरिब मराठ्याने तुम्हाला मोठं केलं त्यांचंच रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली आणि तुम्ही जेलमध्ये गेलात.

प्रवीण दरेकर यांचा जरांगे पाटलांवर आरोप
जरांगेच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी प्रत्त्युतर दिले. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही, हे अवघ्या जगाला ठावूक आहे. पण, तरीही असा प्रचार शरद पवार गटाकडून नेहमीच केला जातो. आता तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्या सांगण्यावरुन हे बोलत आहेत, अशी शंका येते. कुणाच्या राजकीय बंदुकीला त्यांनी आपला खांदा वापरु देऊ नये, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं ट्वीट दरेकरांनी केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube