उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

Uddhav Thackeray on Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीवरुन राजकारण तापलं आहे. हा प्रकल्प बारसूत होऊ नये म्हणून स्थानिक लोक विरोध करत आहेत. ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. बारसूत सुरु असलेल्या आंदोलकांना भेटणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेत केली होती. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलीसांनी नाकारली आहे.

रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसुचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत.

Sharad Pawar यांचा राजीनामा नामंजूर; अजितदादांचे मौन काय सांगते?

राजापुरातील विविध 51 संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार आहे. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीच्या प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरु होणार असल्याची चर्चा आहे. याच ठिकाणी उद्धव ठाकरे उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube