‘वंचितला वापरण्याचा विचार केला तर आम्ही मोदींबरोबर…’; आंबेडकरांचा मविआला थेट इशारा
Prakash Ambedkar on MVA : यंदा देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधून इंडिया (INDIA) आघाडीची स्थापना केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून वंचितचा इंडियात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बुहजन आघाडीचा (Vanchit Buhjan Aghadi) अद्याप इंडियात सहभागी झाली नाही. दरम्यान, यावर आता वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं.
रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ कसा बनवला गेला? आरोपींचे मोठे खुलासे
आज अमरावतीमध्ये वंचितची सभा झाली. या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांना अनेक मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे झाली आहेत. आतापर्यंत या तीन पक्षांमध्ये (काँग्रेस, शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस) जागावाटपावर एकमत झालेले नाही. दोन वर्षांत त्यांना केवळ 48 जागा आपसात वाटून घेता आल्या नाहीत. त्यामुळे मला राहून राहून अशी शंका येतेय की, यांना खरोखरच नरेंद्र मोदींना हरवायचं आहे का?
Maratha Reservation: जरांगेंची मुंबईकडे कूच; सरकारचा मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबत मोठा निर्णय
आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीचे लोक म्हणत आहेत की, वंचितला लोकसभेच्या दोन जागा देऊ. मग मी काँग्रेसला विचारलं, तुम्ही आम्हाला कोणत्या दोन जागा देणार? त्यावर ते म्हणाले, ‘प्रकाशराव आमचंच अद्याप जागा वाटप झालेलं नाही. त्यामुळं तुम्हाला दोन जागा कुठून देणार? त्यामुळे आता तर मला वाटतंय की, यांना युती करायची नाही. त्यामुळं मी मविआला एवढंच सांगेन की, आधी तुम्ही तुमच्या जागा वाटून घ्या, असं आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडीला उद्देशून आंबेडकर म्हणाले, तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण, तुम्ही इथल्या गरीब मराठ्यांना आतापर्यंत वापरत आलेले आहात. त्याच पध्दतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदींबरोबर आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात ठेवा, असा इशाराही आंबेडकरांनी दिला.
वंचित लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवेल
वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरून कॉंग्रेसने वंचितला दूर ठेवलं आहे. वंचितला सोबत न घेतल्यास तुमची सत्ता येणार नाही आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून अनेक कॉंग्रेस नेते तुरूंगात दिसतील. मविआ बरोबर युती झाली नाही, तर वंचित लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवेल, असं आबंडेकर म्हणाले.