संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसात नाही; धानोरकर-वडेट्टीवार यांच्यामधील वाद मिटला
Vijay Wadettiwar: मतभेद असतील, पण मनभेद नकोत. संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसात नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Pratibha Dhanorkar and Vijay Wadettiwar : काँग्रेसच्या (Congress) चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यातील राजकीय वाद चंद्रपूर महानगरपालिकेत विकोपाला गेला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला बसला होता. आता विजय वडेट्टीवार यांनी आपसातील वाद मिटल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले आहे. तेही पक्षाच्या प्रभारीसमोर. त्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांमधील वाद शमला असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसमध्ये आपण सर्वांनी मिळून आता परस्परांमधील लढाई संपवली पाहिजे. आपली ताकद एकमेकांविरुद्ध लढण्यात नाही, तर एकजुटीने सत्याच्या आणि जनतेच्या प्रश्नांच्या लढाईला पुढे नेण्यात आहे.
या एकजुटीची सुरुवात आपण चंद्रपूरपासून करूया. आपण सर्वजण एकत्र येऊया आणि इथूनच नव्या सुरुवातीला… pic.twitter.com/BMy8fpqKGv
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 1, 2026
महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद हे गुरुवारी मुंबईत होते. त्यांनी मुंबईतील प्रदेश मुख्यालयात पदभार स्वीकारला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी थेट खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वादावर भाष्य करत हा वाद मिटला असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले. तेव्हा प्रतिभा धानोरकर या स्टेजवरच बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत नाव घेऊन वडेट्टीवारांनी आपआपसांतील वाद मिटवला आहे. याची सुरूवात चंद्रपूरपासून करूयात असे म्हटले आहेत. तसेच सोशल मीडियावर एक पोस्टही टाकली आहे.
काँग्रेसमध्ये आपण सर्वांनी मिळून आता परस्परांमधील लढाई संपवली पाहिजे. आपली ताकद एकमेकांविरुद्ध लढण्यात नाही, तर एकजुटीने सत्याच्या आणि जनतेच्या प्रश्नांच्या लढाईला पुढे नेण्यात आहे. या एकजुटीची सुरुवात आपण चंद्रपूरपासून करूया. आपण सर्वजण एकत्र येऊया आणि इथूनच नव्या सुरुवातीला प्रारंभ करूया. सत्याला पुढे न्यायचं आहे, जनतेचा आवाज बुलंद करायचा आहे आणि विदर्भाला विकासाच्या मार्गावर पुढे न्यावं लागेल. त्यासाठी काँग्रेसमधील प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता आणि प्रत्येक सहकारी एकदिलाने उभा राहिला पाहिजे. मतभेद असतील, पण मनभेद नकोत. संघर्ष बाहेरच्या अन्यायाविरुद्ध असू द्या; आपसात नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Video : ‘एक हिंदुस्तानी’ ने 9/11 होण्यापासून वाचवलं’; PM मोदींकडून कॅप्टन मच्छार यांना शाबासकी
तीन निवडणुकांमध्ये आपसाद वाद
वडेट्टीवार आणि धानोरकर यांचा संघर्ष गेला दोन वर्षांपासून जोरदार सुरू आहे. या संघर्षाची पहिली ठिणगी लोकसभा निवडणुकीत पडली होती. वडेट्टीवार हे कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी पक्षाकडे तिकीट मागत होते. तर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःहून उमेदवारी जाहीर करत थेट बंड पुकारले होते. त्यानंतर पक्षाने धानोरकर यांना उमेदवारी दिली आणि त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. तर त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोघांमधील वाद दिसून आला. ब्रम्हपुरी मतदारसंघात बाहेरचे लोक येऊन राज्य करत असल्याचा थेट हल्ला धानोरकरांनी वडेट्टीवारांवर केला होता. त्यानंतर वडेट्टीवार जिंकून आले आणि काँग्रेसचे गटनेतेही झाले.
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आमने-सामने
लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर महानगरपालिकेत धानोरकर आणि वडेट्टीवार हे आमने-सामने आले होते. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही महापौरांच्या पदावरून दोन्ही नेत्यांचे गटात झुंपली होती. धानोरकरांनी 15 नगरसेवकांचा वेगळ गट केला होता. शेवटी दोघांच्या वादात दिल्लीतून लक्ष घालावे लागले. पक्षश्रेष्ठींनी महापौरपद धानोरकर गटाला आणि स्थायी समिती वडेट्टीवार गटाला देण्याचा तोडगा काढला होता. पण या दोघांची वादाचा फायदा भाजपने उचलला आणि आपला महापौर बसविला होता. अशा पद्धतीने तीन निवडणुकीत दोघांमध्ये वाद दिसून आला आहे.