भाजपचे ओबीसी प्रेम पुतना मावशीचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटेंनी घेतला समाचार

भाजपचे ओबीसी प्रेम पुतना मावशीचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटेंनी घेतला समाचार

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule), भारतीय जनता पार्टीचे इतर नेते राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीविरोधी असल्याचा धादांत खोटा दुष्प्रचार सुरू केला आहे. भाजपाचे हे ओबीसी प्रेम पुतना मावशीसारखे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे (Praveen Kunte) पाटील यांनी केली. (Praveen Kunte Criticise BJP From OBC)

प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत कुंटे पाटील म्हणाले, या देशात ओबीसी समाजाला धार्मिक दंगलीत ढकलून भाजप राजकीय स्वार्थाकरिता ओबीसी समाजाचा वापर करीत आहे. ओबीसी समाजाबद्दल प्रेम व जिव्हाळा असता तर राज्यात भाजपला ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, तेव्हा वरिष्ट ओबीसी नेते एकनाथ खडसे यांना डावलण्याचे पाप केले नसते. राज्याला पहिला ओबीसी मुख्यमंत्री देण्याचे पुण्य भाजपला पदरात पाडून घेता आले असते. ही चुक दुरुस्त करण्याची संधी पुन्हा शिंदे सरकार स्थापन करताना उपमुख्यमंत्रिपद हे ओबीसी समाजाला देता आले असते. मात्र, आताही ते उच्च जातीला देण्यात आले. भाजपने ओबीसीला उपमुख्यमंत्री न देता आपला बहुजनविरोधी चेहरा दाखविला आहे, असा आरोप त्यांनी केला.

हा तर मुख्यमंत्री शिंदेंचा बालिशपणा, सुरक्षेत कपात अन् शाखेच्या कारवाईवर आदित्य ठाकरे कडाडले… 

चंद्रशेखर बावनकुळे गोंधळलेले
कुंटे म्हणाले की, आजही विदर्भातील ९० टक्के आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे ओबीसी समाजाचे आहेत. इतिहासाचे वाचन करण्याची सवय नसल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांची गल्लत होत असल्याचे त्यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यामध्ये दिसत आहे. मंडल आयोगाची घोषणा तत्कालीन प्रधानमंत्री स्व. व्ही. पी. सिंग यांनी केल्यानंतर मंडलच्या विरोधात आंदोलन करून देश पेटविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी ओबीसी प्रेमाची नौटंकी करू नये. देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करून ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही यावेळी दिला.

ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला बहुजन समाजात प्रस्थापित करण्यात मोलाचा वाटा उचलला, त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा अलीकडे वारंवार होत असलेला अवमान महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने पाहात आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर प्रदेशाध्यक्ष पदावर छगन भुजबळ यांना संधी दिली. उपमुख्यमंत्री पद २ वेळा पक्षाने ओबीसी नेता म्हणून त्यांनाच दिले. त्यानंतर सुनील तटकरे, मधुकर पिचड यांना संधी देवून पक्षाने ओबीसी व आदिवासी समाजाचा समन्वय साधला. मंत्री मंडळातदेखील सर्व जाती व धर्माला व महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube