प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषद…अन् मोठी घोषणा
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेतून पक्षाची भूमिका मांडली.
Press conference by Sharad Pawar’s NCP in Pune : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर. आता पक्षाचे अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी(NCP) आगामी महापालिका निवडणूका सोबत लढवणार असल्याचा चर्चा होत्या. शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्षाच्या वतीने आज मी बापू पठारे, प्रकाश म्हस्के आणि विशाल तांबे यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पुणे अध्यक्षांची भेट घेतली असून आमची भूमिका त्यांना सांगितली आहे. मात्र या चर्चेतून काही समोर आलेलं नसून या युतीसंदर्भात अजून काही बैठकी भविष्यात होतील. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar) पक्षाकडून आम्ही यावर विचार करू असं सांगण्यात आलं असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलं.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी; मागील निवडणुकीत कोणाची कुठे आणि किती होती ताकद?
महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा विषय सांगायचं झालं तर काँग्रेसने ऐन वेळेला भूमिका बदलल्याने सगळी गणित बदलली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून पुण्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी मागील काही दिवसांत घडत होत्या. अखेर या नाट्यमयी घटनांनंतर आज प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर दोन्ही पक्षांत एकमत झालं असल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांकडून मिळाली यावर फक्त शिक्कामोर्बत बाकी असल्याचं बोललं जात आहे.
