राष्ट्रवादीची BJP सोबत चर्चा सुरू, NCP किती दिवस आमच्यासोबत असेल माहीत नाही; चव्हाणांचा मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीची BJP सोबत चर्चा सुरू, NCP किती दिवस आमच्यासोबत असेल माहीत नाही; चव्हाणांचा मोठं वक्तव्य

Prithviraj Chavan on NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण अध्यक्षपदावरून पायउतार होणार अशून, यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं जाहिर केलं. त्यांच्या या निवृत्तीच्या घोषणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतल अन्य घटक पक्ष तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, यातच आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जाते आहे.

एकाबाजूला राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कर्नाटकमध्ये 10 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्शन होणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि भापज दोन्ही पक्ष या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. कर्नाटकमध्ये Congress कमबॅक करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगलाच जोर लावला आहे. राज्यातील अनेक नेते, मंत्री कर्नाटकातील प्रचारसभांमध्ये सहभागी होऊन प्रचार करत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी येथील एका प्रचासभेत बोलतांना मोठे विधान केले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू झाली आहे.

ही तर पवारांची राजकीय खेळी, शेतकरी नेत्याची पवारांवर टीका… 

कॉंग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जेडीएसला रसद पुरवण्याचे काम भाजपकडून केलं जातं आहे. अशाचत राष्ट्रवादीनेही कर्नाटकात कॉंग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तीर आमच्यासोबत आहे. परंतु, आणखी किती दिवस आमच्यासोबत राहील हे माहित नाही, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला.

राष्ट्रवादीची भाजपसोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे. रोज पेपर, टिव्ही यावर बातम्या येतात, की, कोणता नेता जाणार आणि कोण राष्ट्रवादीत थांबणार. त्यांना काय निर्णय घ्यायचा हे त्यांचं ते बघतील. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळं इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्यासाटी ते निवडणुक लढत आहेत. परंतु, भाजपची टक्केवारी वेगळी आणि राष्ट्रवादीचे टक्केवारी वेगळी आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असं चव्हाण म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube