‘माल’ शब्दावरून पवारांकडून सावंतांची पाठराखण पण, खडेबोलही सुनावले

‘माल’ शब्दावरून पवारांकडून सावंतांची पाठराखण पण, खडेबोलही सुनावले

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत मुंबादेवी मतदारसंघात शिंदे गटाने शायना एनसी यांना (Maharashtra Elections) उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी (Arvind Sawant) वादग्रस्त वक्तव्य केले होते. आम्हाला इम्पोर्टेड माल नको असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात आजही उमटत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही (Sharad Pawar) यावर भाष्य केलं. अरविंद सावंत यांची पाठराखण केली तसेच त्यांचे कानही टोचले.

दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना अरविंद सावंत यांच्या वक्तव्याबद्दल विचारले. त्यावर शरद पवार म्हणाले, अरविंद सावंत यांच्याकडून शब्द इकडचा तिकडे झाला असेल. पण व्यक्तिगत हल्ला झाला होता असे वाटत नाही. निवडणुका समोर आहेत तेव्हा कारण नसताना काहीतरी वाद निर्माण केला जात आहे.

आता आपल्याला पुन्हा संधी मिळणार नाही असे सत्ताधारी पक्षाला वाटत असल्याने अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र महिलांबद्दल किंवा कुणाबद्दलही बोलताना काळजी घ्यावी हे मला देखील मान्य आहे असे शरद पवार म्हणाले. या वक्तव्यातून त्यांनी अरविंद सावंत यांची पाठराखण केली पण त्यांचे कानही टोचल्याचा अर्थ प्रतित होत आहे.

20 नोव्हेंबरपूर्वीच शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा, तुतारी बाबत मोठा निर्णय  

नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांच्या प्रचारा दरम्यान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत ‘माल’ म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्हाला इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे असे वक्तव्य त्यांनी केले. माल म्हणताना त्यांनी कुणाचा उल्लेख केला नाही. मात्र या मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेवार शायना एनसी यांनी मात्र अरविंद सावंत यांनी मलाच उद्देशून हे वक्तव्य केल्याचा दावा शायना एनसी यांनी केला.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार शायना एनसी यांनी शुक्रवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप दाखवत गंभीर आरोप केला. अरविंद सावंत यांनी प्रचारादरम्यान इम्पोर्टेड माल म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. सदर व्हिडीओ क्लिप दाखवत शायना एनसी यांनी ठाकरे शिवसेना आणि अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube