Pune : कसब्यात संघ स्वयंसेवक करणार भाजपचा प्रचार

Pune :  कसब्यात संघ स्वयंसेवक करणार भाजपचा प्रचार

कसबा विधानसभेच्या ( Kasaba Byelction )  प्रचार जोरदार सुरु आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने ( Hemant Rasane )  हे निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. या निवडणुकीत आता एक मोठी घडोमोड झाली आहे. कसब्यामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS )  स्वयंसेवक उतरणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी भाजपचे गिरीश बापट हे सलग पाच वेळा निवडूण आलेत. 2019 साली त्यांच्या जागेवर भाजपच्या मुक्ता टिळक या निवडूण आल्या होत्या. पण त्यांचे निधन झाल्याने ही निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत आता थेट रा. स्व. संघाचे स्वयंसेवक प्रचार करणार, अशी माहिती आहे. यासाठी संघाच्या पुण्याच्या कार्यालयात प्रचार रणनितीसाठी एक महत्वची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता या निवडणुकीत आणखी चुरस वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी महायुती परिचय बैठक घेतली. या बैठकीसाठी भाजप, शिंदे गट, रिपाई आदी महायुतीचे पक्ष सहभागी होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात भाजप मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube