Video : घरात वेगळी आणि बाहेर वेगळी ही भूमिका चालत नाही, पवार कुटुंबात फूटच; रोहित पवारांची भूमिका

  • Written By: Published:
Video : घरात वेगळी आणि बाहेर वेगळी ही भूमिका चालत नाही, पवार कुटुंबात फूटच; रोहित पवारांची भूमिका

Rohit Pawar On Pawar Family divide: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात एकमेंकांवर जोरदार टीका झाली. पवार कुटुंबाचा संघर्ष थेट बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी नणंद-भावजयीचे लढत अख्या देशाने बघितलीय. अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार, पुतण्या युगेंद्र हे त्यांच्या विरोधात गेले होते. पवार कुटुंब राजकारणामुळे फुटल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. परंतु खासदार सुप्रिया सुळे यांचे एक विधान मात्र कायमच चर्चेत राहिले आहे. राजकारण वेगळे आहे. नातेसंबंधात कटुता येणार नाही. पवार कुटुंब फुटलेले नाही, अशी भूमिका सुळे यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. पण आता शरद पवार गटाचे युवा नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लेट्सअप चर्चामधील विशेष मुलाखतीत सुप्रिया सुळे यांची भूमिका खोडून काढली आहे.


धंगेकरांना भलताच आत्मविश्वास; संसदेत भाषणासाठी इंग्रजीचा क्लास ही लावणार

पवार कुटुंबात राजकीय फूट आहे. राजकीय विरोध आहे. राजकीय हमरीतुमरी आहे. पण कुटुंबात फूट पडलेली नाही, या वाक्याचा विरोधाभास तुम्हाला वाटत नाही का ? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, मला पण ते वाक्य कळत नाही, ते मला योग्यही वाटत नाही. जर विचारामध्ये भिन्नता असेल, राजकीय दृष्टीकोन नाहीतर काही असो भिन्नता आहे. विषय संपला. त्यामुळे दोन्ही बाजू असू शकत नाही. एकच बाजू असेल, असे मला वाटते.


दुटप्पी भूमिका चालणार नाही

माझे एकच मत आहे, राजकीय दृष्टीकोनातून तुम्ही खालच्या लेव्हलला जावून कुटुंबातीलच एका व्यक्तीबद्दल आणि नेत्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट राहिलेला नाही. मग घर आणि राजकारण वेगळं अशी दुटप्पी भूमिका कुटुंबातही आणि राजकारणतही चालत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवारांनी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर अनेकदा निशाणा साधला होता. दोन वेगळे पक्ष झालेले आहेत. तसेच पवार कुटुंब फुटलेले आहे, असे थेट भाष्यही अजित पवारांनी एका सभेत केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube