‘वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण?; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांच्या ट्विटने वेधलं लक्ष

‘वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण?; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांच्या ट्विटने वेधलं लक्ष

Rohit Pawar Tweet: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तर राष्ट्रवादीमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) यांनी व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.’वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…’ अशा आशयाचं व्हिडीओ ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तामध्ये आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आमदार रोहित पवारांनी या व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवारांच्या संघर्षाचा प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. तो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडीवर, राष्ट्रवादीच्या फुटीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्या बाजूलाच बसल्याचे देखील दिसून आले आहे.

यामुळे पवार घराण्यातील व्यक्ती असलेले रोहित पवार हे शरद पवारांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. २०१९ मध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीच्या काळात देखील रोहित पवारांनी एक सूचक प्रतिक्रिया दिली होती. आपण शरद पवारांच्या सोबत असल्याचे सांगितलं होतं. आता देखील त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत शरद पवारांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. शरद पवारांच्या संघर्षाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महाराष्ट्रातले कार्यकर्ते एकसंघ पणाने शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत. ही भूमिका जागोजागी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा व्यक्त करतात. मला खात्री आहे की आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलवून घेण्यात आलं त्यांच्या कशावर सह्या घेतल्या अजून आम्हाला कळलेलं नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी यावेळी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube