Gautam Adani : रोहित पवारांचा अदानी यांना पाठिंबा : ‘पुरोगामी’ कोमात

Untitled Design   2023 02 09T124451.089

मुंबई : ‘सगळ्यात जास्त एम्पॉयमेंट कोणती कंपनी देत असेल तर ती रिलायन्स आहे. त्यानंतर टाटा आणि त्यानंतर अदानीचा नंबर लागतो. मात्र अदानी कंपनीवर ज्या हिंडनबर्ग कंपनीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांचा जो धंदा आहे ता असाच आहे. की ते उलटी पोजिशन घेतात. शेअर पडत गेले की, त्यांना तेवढा नफा जास्त होतो. पण आशा परिस्थितीमध्ये जे काही स्टेटमेंट त्या कंपनीने केले आहे. ते सिद्ध करण्यासाठी वेळ जाणार आहे.’

‘यामध्ये मार्केट खाली आल्याने या कंपनी मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला. त्यांचा फायदा झाला पण सामान्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये जो काही पैसा टाकला होता. त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर एलआयसी आणि एसबीआयने देखील त्यामध्ये पैसा टाकला होता. त्या पैशाला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माम झाली आहे.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांचा गौतम अदानी यांना पाठिंबा आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधींचे ‘ते’ वक्तव्य अखेर हटवले…

रोहित पवार यांच्या विषयी अनेक पुरोगामी विचारवंतांना आस्था आहे. अदानी प्रकरणावरून ते मोदी सरकारवर हल्ला करत आहेत. पण रोहित पवार यांनीच अदानी यांची बाजू लावून धरल्याने त्यांची कोंडी झाली आहे. पुरोहित यांनी बारामतीमध्ये गौतम अदानी यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते. तेव्हाच रोहित हे अदानी यांच्या प्रेमात असल्याचे दिसून आले होते.

हिंडनबर्ग चौकशी प्रकरणात अडाणी अडचणीत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यावर काहीच भाष्य केलेले नाही. तर रोहित हे थेट पाठिंबा देऊन मोकळे झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी देखील शरद पवार या प्रकरणावर काय बोलले का ? अशी विचारणा सोशल मीडियावर केली होती.

दरम्यान संसदेच्या आधिवेशनात सध्या उद्योगपती अदानीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे.

काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर सरकार जोरदार हल्लाबोल सुरु ठेवला आहे. खासदार राहुल गांधी या मुद्द्यावर आक्रमक दिसत आहेत. इतके की, आधिवेशनादरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य संसदेच्या कार्यवाहीतून काढून टाकण्याची वेळ आली आहे.

Tags

follow us