सैतानाला पाप फेडावं लागतंय, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर घणाघात…
Sadabhau Khot News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक नेत्यांचं सैरावैरा झाल्याचं चित्र उभा महाराष्ट्र पाहत असतानाच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर घणाघात केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा ‘सैतान’ असा उल्लेख करीत सडकून टीका केलीय. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात सदाभाऊ खोत-शरद पवार यांच्यात जुंपणार असल्याची शक्यता आहे.
‘मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं, आधी निवडून तर या’; भुजबळांचं राऊतांना उत्तर
फुटीनंतर राज्यात पुन्हा एकदा संघटनेची घडी बसवण्यासाठी शरद पवारांचा राज्यभर दौरा सुरु आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचा अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि शरद पवारांमध्ये चांगलीच जुंपलीय. त्यात आता सदाभाऊ खोत यांनीही उडी घेतली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार यांच्यावर नियतीने सूड उगवला आहे. सैतानाला त्याचं पाप फेडावं लागत असल्याचं म्हणत त्यांनी पवारांवर थेट भाष्य केलं आहे.
‘आधीच योग्य वागले असते, तर ही वेळ आली नसती’; अजित पवार गटातील नेत्यानं आव्हाडांना सुनावलं
तसेच शरद पवारांना गावगाड्याचा कारभार विस्कळीत केला होता. त्यांच्या सरदारांनीही हेच काम केलं होतं. त्यामुळे आता गावगाड्यांमध्ये असा सैताना आणि त्याचे सरदार पुन्हा उभे राहता कामा नये, हे काम आम्हा कार्यकर्त्यांना करावं लागणार असून ही लढाई गावगाड्याचीही असणार आहे, असं खोत यांनी स्पष्ट केलं आहे.
सभापतीनींच पक्षांतर केले, त्यांच्या पक्षांतर बंदीची सुनावणी कुणासमोर चालणार?
सध्याच्या राजकारणावरुन एकंदरीत पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या गवताचा भारा विस्कटवून टाकला आहे. या गवताच्या पेंड्या आता दाही दिशाला गेल्या आहेत. पेंड्याच्या काड्या होऊन काही दिवसांनी त्या मोडल्या जाणार असल्याचीही टीका त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या गवताचा भारा विस्कटून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसेच राज्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, सुधाकर नाईक, वसंत पाटलांचं मोठं योगदान आहे. 80 च्या दशकानंतर राज्याच्या राजकारणात शरद पवारांचा उदय झाला तिथूनच ही राजकारणाची सुरुवात झाल्याचं ते म्हणाले आहेत. पुण्यात ‘काका मला वाचवा’ अशी हाक ऐकून आली होती पण महाराष्ट्राला आता ‘पुतण्यापासून मला वाचवा’ अशी नवी हाक ऐकून असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.