‘सामनामधील सगळंच खरं नसतं’; रोहित पवारांचा राऊतांना टोला

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 13T123239.763

Rohit Pawar On Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आपल्या सामना वृत्तपत्रामध्ये रोखठोक अग्रलेख लिहीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सामनाच्या अग्रलेखामध्ये अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली की त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करावे लागेल, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सामनामध्ये विविध आर्टिकल येत असतात. त्यातील सगळेच आर्टिकल हे चांगले असतात किंवा सत्याला धरुन असतात असे नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांना फटकारले आहे. तसेच प्रत्येकाची लिहिण्याची आपापली स्टाईल असते. लिहीत असताना कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. पण बाहेरुन बसून कोणी असं दुसऱ्या पक्षाविषयी लिहिण्यापेक्षा सामान्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करावं, असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळे सामनाने सामान्य लोकांच्या परिस्थितीवर लिहावे, राजकीय तर कोणीही लिहू शकतं, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

Shinde vs Fadnavis : सर्व्हेपेक्षा निवडणुकीतील कौल महत्वाचा; बावनकुळेंनी फेटाळला शिंदेंचा दावा

तसेच गॅसचा वापर करा, रॉकेलचा वापर करा किंवा कोणत्याही इंधनाचा वापर करा पवारांमध्ये कोणीही आग लावू शकत नाही. ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले त्यांना कळून चुकलेले आहे. त्यामुळ पवार हे रसायन काय, विचार काय अन् आमची ऐकी काय हे बाहेर बसून कुणालाच कळू शकत नाही. आतल्याच लोकांना ते कळू शकतं, असे पवार म्हणाले.

कितीही कुरघोड्या करु द्या, युतीचंच सरकार आणायचंय, मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलं…

दरम्यान, काल सामनामध्ये संजय राऊतांनी अग्रलेख लिहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे अन् राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. आपल्या पक्षात आधी लक्ष द्या, असे त्यांना सुनावले होते.  यानंतर रोहित पवारांनीदेखील राऊतांवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us