‘घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण, निवडणूक आयोग हा आज मोदी शाह निवडणूक आयोग बनला’, सामनातून टीकास्त्र

  • Written By: Published:
‘घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण, निवडणूक आयोग हा आज मोदी शाह निवडणूक आयोग बनला’, सामनातून टीकास्त्र

Sanjay Raut On PM Modi : सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने चांगलेच कंबर कसली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह त्यांच्या सरकारी लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले. यावरूनच आता सामनाच्या रोखठोकमधून मोदी-शाह आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) घणाघाती टीका केली. देशाचा निवडणूक आयोग हा आज-मोदी शाह निवडणूक आयोग बनला अशी टीका त्यांनी केली.

Uttarkashi Tunnel : नवव्या दिवसाशीही 40 मजुरांचे आयुष्य अंधारातच! परदेशी यंत्रणेसह सहा पथके बचावकार्यात 

आजच्या रोखठोकमध्ये म्हटलं की, भारताचा सध्याचा निवडणूक आयोग भंकपपणाचे प्रतीक बनला आहे. या देशात एक निवडणूक आयोग आहे. आणि मनात आणले तर तो स्वतंत्रपणे आपले कर्तव्य बजावू शकतो. टी. एन. शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाच्या डरकाळीची गरज नव्हती. तर वाघाने शेपटी हलवली तर सर्वच राजकीय पक्षांचा थरकाप उडे. मात्र, आज निवडणूक आयोग पिंजऱ्यातला पोपट झाला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे सिद्ध झाले. या निवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नरेंद्र मोदींपासून अमित शहांपर्यंत भाजपच्या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले, अशी टीका रोखठोकमधून करण्यात आली.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू; प्रकाश शेंडगेंचा इशारा 

काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा आहे. लखनौ येथील सभेत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेल्या हातावर मला देव आणि संत असल्याचा भास होतो, या विधानावर तेथील भापजने राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगात व कोर्टात दाव घेतली. पंतप्रधान बजरंग बलीच्या नावाने मते मागतात. तर गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशात घोषणा केली, मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आणा आणि राम लल्लाचे मोफत दर्शन घ्या. हे विधान सरळ सरळ धार्मिक प्रचार मोडते. मतदारांना ‘लाच’ देऊन मते मागणे धक्कादायक आहे आणि देशाचा निवडणूक आयोग त्याकडे डोळेझाक करतो, हे लोकशाहीसाठी घातक आहे.

एक तर, पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात भाग घेऊ नये आणि तसे केल्यास त्याचा संपूर्ण खर्च त्यांच्या पक्षाने उचलला पाहिजे. यावर निवडणूक आयोग मूकदर्शक राहू शकत नाही. सरकारच्या खर्चाने होणार धार्मिक प्रचार, द्वेषयुक्त भाषण हे प्रकार आजच्या निवडणूक आयोगाला खुपत नाही, हे आश्चर्च आहे देशाचा निवडणूक आयोग आज मोदी-शहा निवडणूक आयोग झाला आहे. सर्व घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे. निवडणूक आयोगही यापासून सुटला नाही, अशी टीका करण्यात आली.

अमित शहा यांनी अयोध्येचा फुकट दौरा करून मध्य प्रदेशातील मतदारांना आमिष दाखवले. पुलवामातील जवान शहीद होणे हा भाजपचा निवडणूक मुद्दा आहे. हे गंभीर आहे, असंही रोखठोकमध्ये म्हटलं

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube