सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाने संजय राऊतांसारख्यांच्या कानशीलात लगावली; संजय गायकवाडांचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाने संजय राऊतांसारख्यांच्या कानशीलात लगावली; संजय गायकवाडांचा हल्लाबोल

Sanjay Gaikwad On Sanjay raut : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

लग्न ठाकरे गटाच्या नेत्याचं अन् जल्लोष शिंदेंचा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून तसेच त्यांच्या नेत्यांकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. यादरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन संजय राऊतांसारख्यांच्या चांगलीच कानशीलात लगावली आहे.

यावेळी ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. हेच आम्ही सांगत होतो. विरोधकांना चांगल्या उकळ्या फुटत होत्या. संजय राऊत यांच्यासारख्यांच्या चांगलीच कानफाटात मारली आहे. राज्यातील अशा बकबक करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर केली आहे.

त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने कुठेही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य असल्याचं म्हटलं नाही. त्याच्याऐवजी उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीच्या अगोदर राजीनामा द्यायला नको होता असं न्यायालयाने म्हटलं आहे. आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य नसल्याचंही यावेळी संजय गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube