Sanjay Kakade : ‘फडणवीसांची आम्हाला कसब्यात प्रचार करण्याची तंबी’

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (26)

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी ( Kasaba Byelection )  भाजपने ( BJP ) आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. यासाठी भाजपने कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण अशी नेते मंडळी प्रचारासाठी उतरवली आहेत. आता भाजपचे पुणे शहरातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार संजय काकडे ( Sanjay Kakade )  हे देखील प्रचारासाठी सक्रीय झाले आहेत. या  निवडणुकीत आमचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne )  नक्कीच विजयी होतील,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा होती. यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. मी कुठेही नाराज नव्हतो. मी माझ्या व्यवसायाच्या कामासाठी बाहेर होतो. या निवडणूकीत आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सगळ्या नेत्यांना तंबी दिलेली आहे. 26 तारखेपर्यंत आमच्या सगळ्या नेत्यांना कसबा मतदारसंघात प्रचार करायला सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया काकडे यांनी दिली आहे. यासाठी भाजपची काली बैठक देखील झाली आहे. आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभेच्यादृष्टीने ही निवडणूक आमच्यासाठी महत्वाची असणार आहे. गेल्या सहा महिन्यात आमच्या सरकारने केलेली कामे, आम्ही जनेतपर्यंत पोहोचवणार आहोत.

तसेच या निवडणुकीत आम्ही 25 ते 28 हजार मतांनी विजयी होणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गिरीश बापट हे कुठेही नाराज नाहीत. त्यांची तब्येत बरी नाही आहे. माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून बापटांची सगळी टीम सक्रीय आहे. तसेच ही निवडणूक एवढी अवघड नाही आहे, त्यामुळे आम्ही ही निवडणूक आम्ही नक्कीच जिंकू, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube