भाजपमध्ये सर्व इम्पोर्ट-एक्सपोर्ट माल, मोदीदेखील एक्सपोर्ट होतील; राऊतांनी डिवचलं

भाजपमध्ये सर्व इम्पोर्ट-एक्सपोर्ट माल, मोदीदेखील एक्सपोर्ट होतील; राऊतांनी डिवचलं

Sanjay Raut Criticize BJP and pm modi on defection : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपला पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नेते आणि उमेदवारांवरून टीकास्त्र सोडलं. तसेच त्यांनी यावेळी स्वतः नरेंद्र मोदी ( pm modi ) देखील हिमालयात एक्सपोर्ट होतील. अशी टीका केली आहे. राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ची जादू; राजकुमारच्या चित्रपटाने पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष नकली आहे. ओरिजनल नाही. स्वतःचं असं त्यांच्याकडे काहीच नाही. सर्व एक्सपोर्ट-इम्पोर्ट आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे स्वतः नरेंद्र मोदी देखील एक्सपोर्ट हिमालयात होतील. अशी टीका राऊतांनी केली. त्याचबरोबर राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्रात मोदी जिथे जिथे जातील तिथे भाजपचा पराभव निश्चित आहे. तसेच त्या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार. असंही राऊत म्हणाले.

PM मोदींना छत्रपती शिवरायांचा जिरेटोप, टीका होताच पटेल नरमले; म्हणाले, यापुढे काळजी घेऊ..

त्याचबरोबर यावेळी राऊतांनी प्रफुल्ल पटेलांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांचा जिरे टोप घातल्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांचा जिरे टोप घातला हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. तर ज्या पटेलांवर मोदींनी दाऊतशी व्यवहार केल्याचा आरोप केले होते. त्याच मिरचीवाल्यांकडून मोदींची महाराजांशी तुलना केली जात आहे.

https://youtu.be/THhqS51-8RY?si=ctt_lUwf7JyV9UqF

तर राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका करताना म्हटले की, – ठाणे, मुंबई, नाशिक ,भिवंडी, कल्याण, दिंडोरी या जागा बहुतेक महाविकास आघाडीच्या असतील. मोदींचा ब्रँड आता खतम झाला आहे. चार  जून नंतर त्यांना हिमालयात जायचं आहे व्यवस्था महाराष्ट्राने केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube