Sanjay Raut : “मान कापली तरी चालेल, पण…” : शिंदे गटाची ऑफर धुडकावल्याचा राऊतांनी सांगितला किस्सा

Sanjay Raut : “मान कापली तरी चालेल, पण…” : शिंदे गटाची ऑफर धुडकावल्याचा राऊतांनी सांगितला किस्सा

Sanjay Raut on Shinde Group : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच या बंडखोरीनंतर ठाकरे गटाच्या अनेक आमदार- खासदार आणि नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंवरील नारजीही बोलून दाखवली आहे.

अनिल देशमुख, सुनील केदारांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावण्यासाठी फडणवीसांच्या हालचाली

या दरम्यान आता थेट ठाकरे गटाची ढाल मानल्या जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राऊत म्हणाले की, शिंदे आमचे मित्र होते. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तसेच मलाही शिंदे गटात जायची ऑफर होती. मात्र मी शिंदे गटात जात नाही, शिवसेना ठाकरे गट सोडत नाही म्हणून मला तुरूंगात टाकलं. पण मी शिंदे गटात न जाता तुरूंगात गेलो. मला ही ऑफर दिली होती त्याबद्दल सर्वांना माहीत आहे. पण मी म्हटलं मान कापली तरी मी शिंदे गटात जाणार नाही. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

Exclusive : रोहित पवार कसे झाले सतिश मगर यांचे जावई? स्वतः सासऱ्यांनीच सांगितला किस्सा

शिंदे आणि ठाकरेंमधील वादामध्ये आतापर्यंत घडलेल्या घडामोडी सांगायच्या झाल्या तर गेल्या 11 महिन्यांपासून शिवसेनेमधील शिंदे आणि ठाकरे हा वाद विकोपाला गेलेला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर शिंदे यांनी थेट शिवसेना या पक्षावर आणि पक्षचिन्हावरच दावा केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे. दरम्यान निवडणुक आयोगाने शिंदे यांना शिवसेना आणि पक्षचिन्ह दिलं.

2000 Rupees Note: भारतात फक्त दोन हजाराची नोट मोठी, पाकिस्तानात सर्वात मोठी नोट कितीची माहित आहे का?

दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) 11 मे ला दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला.

अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube