संजय राऊत हा पवारांची पायपुसणी… आमदार शिरसाटांची खोचक टीका

संजय राऊत हा पवारांची पायपुसणी… आमदार शिरसाटांची खोचक टीका

Sanjay Shirsat criticizes Sanjay Raut : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हा शरद पवारांची पायपुसणी आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सतत शरद पवार…शरद पवार करत असतात. त्यांच्या घरी जात असतात अशा शब्दात शिरसाट यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच अध्यक्षांनी निर्णय देण्यापूर्वीच ठाकरे गटाकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच संजय राऊत यांच्याकडून सातत्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका टिपण्णी केली जात आहे. याला आळा बसावा यासाठी आमदार शिरसाट यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार शिरसाट यांनी केली आहे.

दरम्यान आज संजय राऊत यांच्या एका टीकेला उत्तर देताना शिरसाट यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे पायपुसणे झाले आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सतत शरद पवार…शरद पवार करत असतात. त्यांच्या घरी जात असतात. ते स्वतः जातात व उद्धव ठाकरे यांना देखील घेऊन जात असतात. त्यामुळे याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहे.

म्हणूनच राऊतांनीं दुसऱ्यावर टीका करण्यापूर्वी आपण स्वतः काय करतो आहे हे एकदा आपल्या मनाला आपण विचारले पाहिजे असा सल्लाही शिरसाट यांनी राऊत यांना दिला आहे. तसेच आपण कोणाची दलाली करतो आहे हे आपण पहिले पाहिजे असा खोचक टोला देखील शिरसाट यांनी लगावला आहे.

संजय राऊत हा स्वतःला सुप्रीम कोर्टापेक्षाही मोठा समजतो. बेताल वक्तव्य करून आपण प्रसिद्ध कसे होऊ, तसेच आपण पक्ष चालवतो आहे असा समाज झाला आहे. ठाकरे गटाचा पक्ष हा संजय राऊत चालवतो आहे. आणि तोच या पक्षाला रसातळाला घेऊन जाणार आहे. त्यानंतर एक दिवस असा येईल की संजय राऊत हा शरद पवारांच्या मांडीवर बसलेला दिसून येईल अशा कडव्या शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube