‘अशोक खरातच्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झालाय’; शहाजी बापूंनी सांगितला सांगोल्यातला ‘तो’ किस्सा

Shahaji Bapu Patil माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ चित्रपटाचा उल्लेख करत अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले.

Shahaji Bapu Patil

Shahaji Bapu Patil Mentions Ahok Kharat ‘Maharashtra Epstein File’: सांगोला येथे आयोजित शिवसेना मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि अभिनेत्री तथा शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद उपस्थित होते. यावेळी दिपाली सय्यद अभिनीत महाराष्ट्र एपस्टीन फाईल या चित्रपटाचा उल्लेख माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केला.

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा; सारथी योजनेतून परदेशी शिक्षणाच्या शुल्काची मर्यादा हटवली

सांगोल्यात अशोक खरात याने केलेल्या कथित पूजेचा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे का, असा प्रश्न त्यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना केला. सांगोला येथे आयोजित शिवसेना यावेळी शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत अशोक खरातशी संबंधित सांगोल्यातील कथित प्रकाराचा किस्सा सांगितला.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)

नागपुरात दहीहंडीला डीजेचा दणदणाट; नितीन गडकरींची उपस्थिती, डेसिबल तपासण्यासाठी पोलिस घटनास्थळी

शहाजी बापू पाटील म्हणाले, “अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला. उघड्या-नागड्या पद्धतीने धिंगाणा घालत जवळा येथे पूजा केली. माझा भाचा अतुल पवार याचा निवडणुकीत पराभव करून त्याला जीवे मारण्यासाठी ती पूजा केली होती,” असा दावा त्यांनी केला.

16 तासांहून अधिक काम, मोबदला मात्र शून्य; विनावेतन कामात भारत जगात नंबर 1

पुढे बोलताना शहाजी बापूंनी भाचा अतुल पवार याला दिलेल्या धीराचाही उल्लेख केला. “मी माझ्या भाच्याला सांगितलं, तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाहीस, काळजी करू नको” असे ते म्हणाले.

‘त्याची कवटी फोडली, 60 टाके पडले’; व्हायरल मुलाखतीनंतर इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात

याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिपाली सय्यद यांना उद्देशून “अशोक खरातवर चित्रीत होत असलेल्या चित्रपटात सांगोल्यात घडलेला हा प्रसंग घेतला आहे का?” असा सवाल बापूंनी केला होता.

follow us