… म्हणून मी शपथविधीला आलो नाही, शरद पवारांचा मोठा खुलासा

  • Written By: Published:
… म्हणून मी शपथविधीला आलो नाही, शरद पवारांचा मोठा खुलासा

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसल्याचे खरे कारण शरद पवार यांनी सांगितले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता मात्र संसदेचे अधिवेशन सुरू होतं ते सोडून येणं शक्य नव्हतं म्हणून मी आलो नाही. असा खुलासा त्यांनी यावेळी केला तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेत्याबद्दल विधानसभा निर्णय घेईल याबाबत आम्ही काय सांगायचं. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

तसेच यावेळी त्यांनी ईव्हीएम (EVM) आंदोलनाबाबत देखील माहिती दिली आहे. ईव्हीएमबाबत आमची चर्चा सुरु असून लवकरच याबाबत पुढील दिशा ठरवू आणि तुम्हाला सांगू असं शरद पवार म्हणाले.

माजी मंत्री मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आयुष्यभर काम केलं. पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी काम केला. त्यांनी सरकारमध्ये अनेक खाती संभाळली आणि आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केली.

2030 मध्ये महाराष्ट्रातील 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असणार, देवेंद्र फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याच आम्हाला दुःख आहे त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्यासाठी परमेश्वर त्यांन शक्ती देवो हीच प्रार्थना असं शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube