शरद पवार खेळणार मोठी खेळी; भाजपमधील माजी आमदारांसाठी पायघड्या

शरद पवार खेळणार मोठी खेळी; भाजपमधील माजी आमदारांसाठी पायघड्या

Sharad Pawar : पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवार यांनी भाजपमधीलच माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपने ज्या माजी आमदारांकडे दुर्लक्ष केलं आहे, अशा आमदारांवर शरद पवार लक्ष देणार असून त्यांना पक्षात घेत रसद पुरविण्याची खेळी खेळण्याच्या तयारीत पवार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Sharad Pawar has contacted former BJP MLAs and has started preparations to take them to the NCP)

अजित पवार यांनी या महिन्याच्या सुरुवातील राष्ट्रवादीत उभी फूट पाडत भाजप आणि शिवसेनेसोबत संधान साधलं. त्यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांनी, आमदारांनी शरद पवार यांची मनधरणी करत त्यांना सरकारसोबत येण्याची विनंती केली. मात्र त्यांनी आपण आयुष्यभर ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्यासोबतच कसं जाऊ? असा सवाल करत पुन्हा ताकदीने पक्ष उभं करण्याचा निर्धार बोलून दाखविला.

MIDC : रोहित पवारांचा दबाव, राम शिंदेंचा आग्रह… पण उदय सामंत शेवटपर्यंत बधलेच नाहीत!

याच पार्श्वभूमीवर आता पवार यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. ते पक्ष बांधणीवर लक्ष देत आहेत. याशिवाय पक्षातील माजी आमदारांना मतदारसंघात पुन्हा सक्रिय होण्याच्या सुचना दिल्याची माहिती आहे. या माजी आमदारांना निवडणुकीला उभं राहण्याच्या हिशोबानेच ताकद आणि रसद पुरविण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरु केली असल्याची माहिती आहे. याशिवाय भाजपमधीलच माजी आमदारांसाठी शरद पवार यांनी पायघड्या घातल्या असल्याची माहिती आहे. त्यांना राष्ट्रवादीत घेऊन पुन्हा पर्यायी नेतृत्व उभं करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

राम शिंदेंना झटका! रोहित पवारांच्या कंपनीविरोधातील गुन्ह्याला हायकोर्टाची स्थगिती

भाजपमधीलच माजी आमदारांसाठी शरद पवार यांच्या पायघड्या :

निवडणूक हारलेल्या, राजकारणात कमबॅक करण्याची इच्छा असलेल्या पण भाजपकडे इतर पक्षांच्या नेत्यांमुळे संधी मिळत नसलेल्यां, भाजपने दुसऱ्या नेत्यांना संधी देत अडगळीत टाकलेल्या, भाजपवर नाराज आणि अस्वस्थ असलेल्या माजी आमदारांना सोबत घेण्याची तयारी शरद पवार यांनी सुरु केली आहे. अशा माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना निवडणुकीसाठी रसद पुरवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या माजी आमदारांना फोडण्यात शरद पवार यांना यश आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube