भाजपच्या जखमेवर पवारांचं मीठ; शिंदे-फडणवीसांनी मिटवलेला वाद पुन्हा उकरला

  • Written By: Published:
भाजपच्या जखमेवर पवारांचं मीठ; शिंदे-फडणवीसांनी मिटवलेला वाद पुन्हा उकरला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून विरोधकांची टीका सुरूच आहे. या जाहिरातींवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. शिंदे-फडणवीसांनी जाहिरातीचा वाद मिटवला होता. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. असे म्हणत शरद पवारांनी हा मिटवलेला वाद पुन्हा उकरून काढत भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. (sharad-pawar-historical-work-was-done-by-shivsena-advertisement-says)

https://www.youtube.com/watch?v=7X4M0kbLcvU&t=15s

पवार म्हणाले…”महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज असा होता की हे जे सरकार बनलं आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद”

आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी

या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. परंतु शिवसेनेने जाहिरातीमध्ये बदल करत पुन्हा जाहिरात दिली. परंतु यावरून देखील पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आगोदर जाहिरातीवर केलेला खर्च वाया गेला. या जाहिरातीमुळे वृत्तपत्राचा फायदा झाला.

जाहिरातीच्या मुद्यावरून भाजपच्या काही नेत्यांनी उघडपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतले. त्याला शिंदे समर्थक आमदारांनीही जशास तसे उत्तर दिले. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी तर मुख्यमंत्री शिंदे यांना थेट बेडकाची उपमा दिली. याशिवाय 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.. असं म्हणतं कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजीही करण्यात आली. या सगळ्यावर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनीही भाजपला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे युतीत नव्या वादाला तोंड फुटून राजकीय परिणामांची चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube