Sharad Pawar : मला त्यांचे महत्व वाढवायचे नाही, पवारांचा फडणवीसांना टोला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (34)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( NCP )  शरद पवार ( Sharad Pawar )  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )  यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्याशी बोलून झाला होता, असे विधान केले होते. त्यावर राज्यात अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. आज पुन्हा पवारांनी यावर भाष्य केले आहे.

शरद पवारांना आज पुन्हा फडणवीसांच्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भाष्य करुन मला त्यांचे महत्व आणखी वाढवावे असे वाटत नाही, असा खोचक टोला पवारांनी फडणवीसांना लगावला. फडणवीसांनी हा विषय एवढे दिवस झाल्यानंतर का काढला, हे त्यांनाच विचारावे लागेल, असे पवार म्हणाले आहेत. यावेळी ते बॅंकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषद या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील त्यांना फडणवीसांच्या या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा, मला वाटलं देवेंद्र सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. ते अशाप्रकारे असत्याचा आधार घेऊन खोटे बोलतील असे मला कधीही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तर फडणवीसांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोलायाला नकार दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube