NCP भ्रष्टाचारी असेल तर मग सत्तेत का घेतलं? शरद पवारांचा मोदींना सवाल

NCP भ्रष्टाचारी असेल तर मग सत्तेत का घेतलं? शरद पवारांचा मोदींना सवाल

अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट पक्षाचे सर्वसर्वा शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार पक्षातून बाहेर पडतांना एकटेच बाहेर पडले नाहीत, तर अनेक आमदारांना सोबत घेऊन ते बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळं शरद पवार विरुद्द अजित पवार हा संघर्ष उभा राहिला. दरम्यान, अजित पवारांच्या बंडावरून आता शरद पवारांनी अजित पवारांसह भाजपवरही (BJP) निशाणा साधला. (Sharad Pawar on pm modi If NCP is corrupt then why did it come to power)

आज शरद पवारांना पक्षाची बैठक बोलावली होता. या बैठकित बोलतांना पवारांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टाचारी असेल तर आता राज्यात राष्ट्रवादीला सत्तेत का सहभागी करून घेतलं? असा सवाल पवारांनी केला. कुठलाही आधार नसतांना अशी विधानं पंतप्रधानांनी करू नये. पंतप्रधान हे कोण्या एका पक्षाचे नसतात, तर ते देशाचे असतात, पण मोदी हे एका राष्ट्रीय पक्षाचे पंतप्रधान असल्याचा सारखेच वागतात, अशी टीका त्यांनी केली.

दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार 

अजित पवारांनी बंड केल्यानंतर सर्व आमदारांचं समर्थन आपल्याला आहे, असा दावा केला होता. या दाव्यावर बोलतांना पवार म्हणाले की, चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो. माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहित आहे, आपलं नाणं चालणार नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, 24 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. तुमच्या मतदीने या 24 वर्षात राज्याच्या कानोकोपऱ्यात नेतृत्वाची फळी तयार करण्यात पक्षाला यश आलं. सामान्य कार्यकर्ते हे आमदार, खासदार मंत्री झाले. राष्ट्रवादीने अनेक न्यायी नेते तयार केले. मनात एकच भाव होता राज्याचा चेहरा बदलवण्याचा. सामान्य माणसांच्या जीवनात प्रकाश कसा येईल, यासाठी पक्ष झटत राहिला. आता आपल्याला आणखी पुढं जायचं. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही. लोकांमध्ये आहोत. लोकशाही टीकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र, देशात संवाद राहिलेला नाही. मात्र, आम्ही विरोधकांना एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू केले, असं पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube