शिंदे-फडणवीस सरकार बदला घेण्यासाठी सत्तेवर बसलंय : रोहित पवारांचा घाणाघात

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (11)

मुंबई : शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार लोकहितासाठी नाही, तर बदला घेण्यासाठी आल्याचा घणाघाती आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानाचा दाखला दिला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

हे डोळ्यासमोर ठेवून येत्या काळामध्ये काही राजकीय स्टेटमेंट भाजपकडून केले जातात, त्यामध्ये काही तथ्य नाही, कारण भाजपची खासियतच आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खोट सुद्धा ते रेटून खरं असल्यासारख ते बोलतात, पण सातत्याने आता त्या गोष्टी ऐकल्यानंतर कुठे तरी आता लोकांना पण समजलं आहे की, याच्यामागे काही तथ्य नाही, आणि हे जे स्टेटमेंट खरं आहे असं ते म्हणतात, तर २०१९ च्या निवडणूकीतच्या आधी ते बोले होते, काही झालं तरी ते राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, आणि आता शपथविषयी घेत असताना, भाजप नव्हतं का तिथं तुम्हीच होता ना तिथे, मग आधी बोलेल स्टेटमेंट हे राजकीय स्टेटमेंट होत, आणि जेव्हा तुम्ही शपथविधी घेत होता. त्यात व्यक्तिगत हितासाठी घेत होता का ? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेना फोडली गेली, बदला घेण्यासाठी सुरवातीला ते म्हणत होते, यात आमचं काही नाही. भाजप याच्यापासून अलिप्त आहे, या रणनीतीमध्ये भाजप कुठेही नाही, आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, या पाठीमागचा कलाकार कोण होत. आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगतात कि मी केलं होत. आम्हाला बदला घायचा होता, आणि बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही शिवसेनेला फोडली, आणि ही सत्ता स्थापन केली असल्याचं यावेळी रोहित पवारांनी यावेळी सांगितलं.

Tags

follow us