Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस हे उलट्या पायाचं सरकार; आता यांना आपटी बार करा

Untitled Design   2023 04 23T211618.490

Shinde-Fadnavis is an upside-down government : शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच सक्रीय झाले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या बऱ्याच सभा झाल्या आहेत. खेड, मालेगाव मधील सभांनतर आता जळगाव जिल्ह्यातही उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला.

उध्दव ठाकरे म्हणाले, हे उलट्या पायाचं सरकार आहे. हे सरकार अवकाळी आलं. हे सरकार म्हणजे संकट आहे. एकातरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल सांगा. एक शेतकरी मला भेटला, कवी आहे. त्यांनी मंचावर आणू शकतो, पण त्याने त्याच्या व्यथेला शब्दांकन करून टाहो फोडला तर त्याला अटक कराल…. यावेळी ठाकरेंनी या शेतकरी कवीच्या काही कविता बालू दाखवल्या. झाल्या असतील तुमच्या वाऱ्या, तर या आता बांधावरी… तुमचं सगळं असेल ओकेमंदी, पण आमच्या कापसाले भाव किती… हे विचारणार शेतकरी… या शेतकऱ्याला मी मुद्दाम इथं आणलं नाही.

Ahmednagar Kusti Spardha : अंतिम लढतीत शिवराज जखमी, महेंद्र गायकवाड ठरला ‘छत्रपती शिवराय केसरी’ चा मानकरी

ठाकरे म्हणाले, जर आज बहिणाबाई असत्या तर त्यांनाही या सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं. बहिणाबाई किती सोप्या भाषेत मर्म सांगत. त्या सोप्या भाषेत सांगायच्या, जो इमानाले इसरला त्याला नेक म्हणू नये, जलम दात्याला भोवला त्याला लेक म्हणून ये… हे जन्मदात्याला भोवणारे सगळे गद्दार. मगाशी घोषणा झाल्या की, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. पण नाही रे बापा, मी अशा गद्दारांचा बाप नाही. अशी घाणेरडी औलाद आपली असू शकच नाहीत. पाठिवरती सोडाच, पण आईच्या कुशीवर वार करणारी औलात आमची असू शकत नाही. हे 40 गद्दार हे नुसते गद्दार नाहीत, तर ते बाप बदलणारे, बाप चोरणारे आहेत. हा महाराष्ट्र शूरांचा आहे, वीरांचा आहे. गद्दारांचा नाही. ही गर्दी फक्त जल्लोष करायला नको, गद्दारांना गाडायचे आहे, शेतातले तण उखडता तसे गद्दारांना अखडून फेका, असं ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले, जळगावमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी हा कष्ट करतो, तो श्रीमंत होत नाही, उलट त्याला जीव देण्याची वेळ येते. पण पंतप्रधानांचा मित्र जगातील श्रीमंतांच्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर येतो कसा? तुमच्या डोळ्यांमध्ये धुळफेक चालली आहे. महागाई कमी झाली नाही. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. आता अब की मार, अब की बार असं म्हणणं बस झालं आता. आता आपटी बार करा यांना, असं ठाकरे म्हणाले.

आज माझ्याकडे काहीच नाही. मला आश्चर्य वाटतं की, आज माझ्याकडे असलेल धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष गद्दारांनी हिरावला. आता हाती काही उरलं नाही. आहेत ते तुमचे. आता बघू कुणाची किंमत आहे, माझं वाकडं करायची…. माझ्यासमोर भाजप हे आव्हानं नाही, पण जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत जे देशाचं नुकसानं होतं, ते कसं भरून काढायचं, हे माझ्यासाठी आव्हानं आहे.

खरं बोललं की, भाजप सुडाच्या कारवाया करते. सत्यपाल मलिक यांनी खरी माहिती सांगितली, पुलवामा हत्याकांडात सगळी चुक गृहमंत्रालयाची आहे. सुरक्षा विभागाने हलगर्जीपणा केल्यांन जवानांचे बळी गेले. आता मलिक हे खरं बोलल्यानं त्यांच्यामागे सीबीआय लावली. गृहमंत्री सांगतात की, मलिक राज्यपाल असतांना का बोलले नाहीत? अमित शाहांनी मलिकांची स्टेटमेंट एकदा वाचावं. मलिक यांनी हे प्रकरण मोदींच्या कानावर घातलं होतं. मात्र, मोदींनी मलिकांना गप्प राहायला सांगितलं होतं. भाजप आज आम्हा विरोधकांमागे जे ईडी-सीबीआय लावते. पण, विरोधी पक्षातले लोक त्यांच्या पक्षात गेले की, शुध्द होतात. आमच्यात असले तर भ्रष्ट, तुमच्यात आल्यावर ते शुध्द कसे होतात. तुमच्यात आल्यावर ते शुद्ध होत असतील तर आमच्यात असतांना भ्रष्ट कसे असू शकतील, असा सवाल केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube