Imtiyaz Jaleel : शिंदेंनी, मराठी माणसांच्या डोक्यावर गुजरातींना आणून बसवलंय
मुंबई :’एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मॅसेज दिला आहे की, आम्हाला मराठी माणसाचं काही एक घेणं देणं नाही आहे. मराठी माणसाला मागे टाकण्याचे काम भाजपने केलेले आहे. शिंदेंनी मराठी माणसांच्या डोक्यावर गुजराती माणसांना आणून बसवलं आहे. यासाठी मराठी माणूस कधीही माफ करणार नाही.’ अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
त्याचबरोबर ते असं देखील म्हणाले की, ‘हे सरकार जितकं भांडण करणार तितकाच अधिक फायदा मला होणार आहे. हे सरकार खुर्चीच्या लालसेपोटी मराठी माणसावर अन्याय करत आहेत. आमच्यामध्ये कितीही मतभेद असला तरी मराठी माणसाला स्वाभिमानाने कसं जगायचे हे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवले होते. त्यांच्या मुलाने खुर्चीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे भाजपचे पपेट आहेत. त्यांचा रिमोट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.’
G 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार; नामांतरावरून Jaleel यांचा सूचक इशारा
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे जिल्ह्याचं धाराशिव नामांतर करण्याला केंद्राने मंजुरी दिली. त्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोठा लढा उभा करणार आहे, रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. तर जी 20 परिषदेच्या औरंगाबादमध्ये बैठकीच्या दरम्यान आंदोलन करण्याचा देखील त्यांनी सूचक इशारा दिला.