मोठी बातमी ! सुनील तटकरे थेट शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात खळबळ पण तटकरेंनी वेगळेच कारण सांगितले

Sunil Tatkare- राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे यांना वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील तटकरे यांनी पहिल्यांदा शरद पवारांची भेट घेतलीय.

  • Written By: Published:
Sharad Pawar And Sunil Tatkare

Sunil Tatkare Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची (Sharad Pawar) यांची मुंबईत भेट घेतलीय. पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झालीय. गुवाहाटी दौऱ्यानंतर थेट तटकरे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे यांना वगळण्यात आल्याचे पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर ही भेट झालीय.विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील तटकरे यांनी पहिल्यांदा शरद पवारांना भेटले आहेत.


हा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर अन्याय, नीट परीक्षा लीक प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्याकडे गेल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचे नाव नाहीत. त्यामुळे तिन्ही ज्येष्ठ नेते नाराज झालेले आहेत. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत एक तांत्रिक चूक झाल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर जाहीर केलेले आहे. मंगळवारी आसामाचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे गेले होते. त्या शपथविधी सोहळ्यानंतर काही तासांमध्ये सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटायला गेलेले आहेत. मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. परंतु तटकरे यांनी एकत्रिकरणाची चर्चा फेटाळून लावली होती. दोन्ही पक्ष वेगळे असल्याचे सांगितले होते.


पोलिसांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; राज्य बँकेचे गृहकर्ज योजनेला 1768 कोटींचे अर्थसहाय्य


राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि भेटीचा संबंध नाही-तटकरे

या भेटीबाबत सुनील तटकरे यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवारसाहेबांची तब्येत अनेक दिवसांपासून ठीक नसल्यामुळे त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. साहेब ब्रीच कॅंडी हॉस्पिटलला होते. आज मी गुवाहटीला शपथविधी सोहळ्यासाठी गेलो होतो. त्यांना आजच वेळ असल्यामुळे त्यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. बाकी काही विषय नाही. दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय, आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो, ठामपणे ते ठिकाणी राहणार आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि भेटीचा संबंध नाही. त्यानंतर या संदर्भात वहिनींनी ट्वीट केलेले आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही. आजची भेट साहेबांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी होती.

follow us