‘तुम्ही दहा वर्ष सत्तेत असूनही…’, फडणवीसांनी पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचा पलटवार

  • Written By: Published:
‘तुम्ही दहा वर्ष सत्तेत असूनही…’, फडणवीसांनी पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचा पलटवार

Supriya Sule on Devendra Fadanvis : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. याच मुद्यावरून मनोज जरांगेंसह विरोधकांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली होती. तर काल फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर त्यांच्या याच वक्तव्यावरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंन फडणवीसांना टोला लगावला. 10 वर्ष सत्तेत असूनही तुम्हाला टीका करायला पवारच लागतात, असं सुळे म्हणाल्या.

‘चोऱ्या केल्या म्हणूनच पक्षातून हाकललं’; महाजनांनी खडसेंचं सगळचं सांगितलं 

काल फडणवीसांनी केलेल्या टीकेविषयी सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्या म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचीच सत्ता आहे. पण, टीका करायला तुम्हाला पवारच लागतात, असा टोला सुळेंनी लगावला. पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, आता 24 तारीख शेवटची बघुयात सरकार काय निर्णय घेतं.

जयंत पाटलांची टीका-
शरद पवार यांच्यावर टीका करणे हा भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे. कालच्या त्यांच्या पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची दिशा आणि सूत्र याविषयी बोलायला पाहिजे होतं. मात्र, त्यांनी अर्धा वेळ शरद पवार यांच्यावर टीका करण्यात घालवला. पवारांवर टीका करण्यात फडणवीस धन्यता मानतात. कारण भाजपला शरद पवारांची भीती वाटते, त्यामुळंच पवारांबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या. त्यांच्यावर चुकीची टीका केली जाते.

कूपनची झेरॉक्स दिली, भर उन्हात थांबवलं, पण साखर नाही भेटली; विखेंविरोधात संताप 

फडणवीस काय म्हणाले?
नागपुरातील महाविजय 2024 या मेळाव्यात बोलतांना फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाचा इतिहास पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वात जास्त कोणी विरोध केला असेल तर तो शरद पवारांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आरक्षणाशिवाय दुसरा प्रश्नच नाही का? असे सांगून प्रश्न फेटाळला होता. जर शरद पवार आणि विरोधकांच्या मनात असते तर मंडल आयोग लागू झाल्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. पण त्यांना कधीच आरक्षण द्यायचे नव्हते. त्यांना फक्त समाज-समाजाला झुंजवत ठेवायचं होतं, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube